18th June Marathi Panchang & Rashi Bhavishya: १८ जून २०२४ ला ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी व द्वादशी तिथी एकत्र आहे. १७ जूनला सुरु झालेली एकादशी आज मंगळवारी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी समाप्त झाली की द्वादशी सुरु होईल. १८ जूनला रात्री ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत शिव योग असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी दुपारी ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र जागृत असणार आहे. १८ जूनला निर्जला एकादशी संपणार आहे. आजच्या दिवशी मंगळ सर्वात शक्तिशाली असणार आहे. पंचांगातील बदल व ग्रहतिथीनुसार आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार हे पाहूया.

१८ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-केलेल्या कामातून समाधान मिळेल. योग्य तर्क वापरता येईल. आपले विचार चलाखीने मांडाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. लहान प्रवासाचा योग येईल.

24th June Panchang & Rashi Bhavishya
२४ जून पंचाग: इंद्रदेव मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींच्या कुंडलीत पाडणार सुखाचा पाऊस; धनवृद्धीने सुरु होईल आठवडा
21st June Panchang & Rashi Bhavishya
वटपौर्णिमा विशेष, २१ जून पंचांग: आज मेष ते मीन पैकी कुणाला लाभणार सौभाग्य; तुमच्या नशिबात कोणत्या रूपात येईल सुख?
1st July 2024 Panchang And Rashi Bhavishya Mesh To Meen Which zodiac signs will be blessed by Lord Shiva Read Daily Marathi horoscope
१ जुलै पंचांग: व्यवसायात भरघोस वाढ ते कौटुंबिक सौख्य; १२ पैकी या राशींवर राहील शंकराची कृपा; वाचा ‘सोमवार’चे तुमचे राशिभविष्य
20th June Marathi Panchang & Rashi Bhavishya
२० जून पंचांग: शेअर बाजारात धनलाभ ते जोडीदाराचा सहवास, गुरूवारी १२ राशींवर बरसणार स्वामी कृपा, वाचा तुमचं भविष्य
27th June 2024 Guruvar Rashi Bhavishya Krishna Paksha Shashti Tithi mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
२७ जून पंचांग: नोकरी, व्यवसायात मिळेल लाभ, कामानिमित्त घडतील प्रवास; मेष ते मीन राशींचा असा जाईल गुरुवार
16th June Panchang & Rashi Bhavishya Marathi
१६ जून पंचांग: सूर्य चमकणार! जूनच्या सर्वात शुभ रविवारी मेष ते मीन राशींना कशी साथ देईल नशीब, वाचा तुमचं राशी भविष्य
17th June Panchang & Rashi Bhavishya Marathi
१७ जून पंचांग: आज ज्येष्ठ एकादशीला ५६ मिनिटांचा मुहूर्त बदलणार राशींचे नशीब; मेष ते मीन राशींचं आजचं विधिलिखित वाचा
6th July Ashadh Prarambh Panchang & Rashi Bhavishya
६ जुलै पंचांग: आषाढ महिन्याच्या सुरुवातीला शनीचं वरदान; आज अचानक धनलाभासह १२ राशींना काय फायदा होईल पाहा

वृषभ:-गोड बोलण्यावर अधिक भर द्याल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. कमिशनमधून चांगली कमाई होईल. बौद्धिक छंद जोपासायला वेळ काढाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता वापराल.

मिथुन:-बौद्धिक हटवादीपणे वागणे राहील. तत्परतेने कामे करण्यावर भर द्याल. जबाबदारीचा एकंदर आवाका लक्षात घ्यावा. हसतहसत कामे साधून घ्या. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

कर्क:-सरकारी कामात अधिक वेळ जाईल. मनातील निराशाजनक विचार दूर करावेत. आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शनाखाली करावी. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कौटुंबिक खर्च आवरता ठेवावा.

सिंह:-तरूणांशी मैत्री कराल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. वरिष्ठांच्या संपर्कात राहाल. चारचौघांत तुमच्या गुणांचे कौतुक केले जाईल. तब्येतीची योग्य वेळी तपासणी करावी.

कन्या:-आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. बुद्धिचातुर्याने कामे करण्यावर भर द्याल. व्यवहारात चतुरता दाखवून द्याल. पुढील परिस्थितीचा अंदाज बांधा. लेखन क्षेत्रातील लोकांना मान-सन्मान लाभेल.

तूळ:-अत्यंत कुशलतेने वागाल. तुमच्या वक्तृत्वावर लोक प्रभावित होतील. प्रवासाची आवड पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. योग्य कल्पनाशक्ति वापराल.

वृश्चिक:-कफ विकाराचा त्रास संभवतो. मनातील इच्छेला मुरड घालू नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. आपले स्वतंत्र विचार प्रभावीपणे मांडाल. संपर्कातील लोकांशी जिव्हाळा वाढेल.

धनू:-तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. भागीदारीच्या व्यवसायात व्यवहार कुशलता दाखवावी. जोडीदाराविषयी मनात गैरसमज बाळगू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

मकर:-इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा. वादाच्या मुद्दयात सहभाग घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींची आवड जोपासता येईल. कल्पनाशक्तीला वाव देता येईल.

कुंभ:-तुमचे बुद्धी-कौशल्य पणाला लागू शकते. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. भडक शब्दांचा वापर टाळावा. आवडते पदार्थ खाण्याबाबत आग्रही राहाल.

हे ही वाचा<< Vat Purnima: लक्ष्मी-नारायण वटपौर्णिमेला ‘या’ तीन राशींची झोळी सुख व पैशांनी भरणार; नशिबात दिसतोय श्रीमंत होण्याचा योग

मीन:-गप्पागोष्टी करण्यात अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. हट्टीपणा थोडा कमी करावा लागेल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर