Vraj Yog 20 June Horoscope: १९ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी अशुभ वज्र योग सुरू होणार आहे. हा योग २० जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राहील. या काळात आणि त्यानंतर काही दिवस ५ राशींसाठी वेळ फारसा चांगला राहणार नाही. वज्र योगाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनावर पडू शकतो. चला जाणून घेऊया, या ५ राशींमध्ये तुमची रास आहे का?

वृषभ राशी (Taurus Horoscope)

अचानक मोठा खर्च समोर आल्याने घराचे बजेट बिघडू शकते. तसेच एखादी मौल्यवान वस्तू हरवू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटेल. याशिवाय नातेवाईकांशी असलेले संबंध आणखी बिघडू शकतात.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मौल्यवान वस्तूची नीट काळजी न घेतल्यास ती खराब होऊ शकते किंवा तुटू शकते. या काळात तुम्हाला गुप्त शत्रूंचाही सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत घरातील ज्येष्ठ मंडळी तुमच्याबद्दल चिंतेत राहू शकतात.

सिंह राशी (Leo Horoscope)

विरोधक सक्रिय राहिल्यामुळे तुम्ही तणावात राहू शकता. तसेच एखाद्या अनावश्यक गोष्टीवर जास्त खर्च होऊ शकतो. या काळात व्यवसायातही अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता कमी आहे.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

खर्च वाढल्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करणारे लोक चिंतेत राहू शकतात. तसेच कर्जाचा हप्ता वेळेवर भरण्यात अडचणी येऊ शकतात. या काळात प्रवासाचा विचार करणाऱ्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

ज्या लोकांना आधीपासून एखादा गंभीर आजार आहे, त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते. तसेच व्यवसायात योग्य निर्णय न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय नातेसंबंध बिघडल्यामुळे तुम्ही मानसिक तणावात राहू शकता.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)