19th June Panchang & Marathi Rashi Bhavishya: १९ जून २०४ ला ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. बुधवारच्या दिवशी सकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी द्वादशी तिथी समाप्त होईल व त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरु होईल. १९ जूनला रात्री ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत सिध्द योग असणार आहे तर संध्याकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत विशाखा नक्षत्र जागृत असणार आहे. १९ जूनला बुध प्रदोष व्रत असणार आहे. या दिवशी तुमच्या राशीच्या भाग्यात काय असणार आहे हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-चैनीच्या वस्तु खरेदी कराल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. थोडी काटकसर करावी लागेल. सामाजिक कामात मदत कराल.

वृषभ:-चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन मित्र जोडले जातील. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील.

मिथुन:-काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल. इच्छेविरूद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात. विचार योग्य प्रकारे मांडावेत.

कर्क:-व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-तुमच्यातील सुप्त गुण इतरांच्या नजरेत येतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सजावटीवर अधिक भर द्याल. घरात टापटीप ठेवाल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.

कन्या:-तुमच्यातील कालगुणांना चांगला वाव मिळेल. कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. काही महत्त्वाच्या कामांना खीळ बसू शकते. स्वत:च्या फायद्याचा आधी विचार कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.

तूळ:-मनाच्या चंचलतेला आवर घालावी. एकसूत्री विचार करून चालणार नाही. पैज जिंकता येईल. कमी श्रमातून पैसे कमवाल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक:-एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत एकोप्याने कामे कराल. संपर्कातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण होतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. चारचौघात तुमची वाहवा केली जाईल.

धनू:-आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आळस झटकून टाकावा लागेल. नातेवाईक मदतीला उभे राहतील.

मकर:-तुमच्यातील कलागुण इतरांच्या नजरेत येतील. छंद जोपासायला अधिक वेळ द्याल. मित्र परिवार गोळा कराल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.

कुंभ:-दिवस समाधानात जाईल. नवीन गोष्टीत अधिक रुची दाखवाल. घरगुती कामे वेळेत पूर्ण होतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आवडत्या वस्तु खरेदी केल्या जातील.

हे ही वाचा<< Vat Purnima: लक्ष्मी-नारायण वटपौर्णिमेला ‘या’ तीन राशींची झोळी सुख व पैशांनी भरणार; नशिबात दिसतोय श्रीमंत होण्याचा योग

मीन:-वाचनाची आवड जोपासता येईल. इतरांचे मनापासून कौतुक कराल. जवळच्या लोकांच्या आनंदात आनंद मानाल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. प्रवासाची हौस भागवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19th june panchang marathi rashi bhavishya budh pradosh vrat mesh to meen horoscope today ma lakshmi to bless your kundali signs astrology svs