1st April Marathi Horoscope Today: नवीन महिन्याच्या सुरुवातीला आज, १ एप्रिल २०२४ ला फाल्गुन कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असणार आहे. आजचा दिवस हा शीतला सप्तमीचा आहे. पण दिवसाच्या उत्तरार्धात अष्टमी तिथीला (कालाष्टमी) ला सुद्धा प्रारंभ होणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी नेमका सोमवार सुद्धा जुळून आला आहे. आज रवी व वारियन योग कायम असेल तर आज मूल नक्षत्र जागृत असणार आहे. आजच्या दिवशी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी सकाळी ९ वाजून २० मिनिटांपर्यंत राहू काळ असल्याने उर्वरित दिवस सुखकर होईल. आज मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसाचे राशी भविष्य

मेष:-खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लेखनी जपून चालवावी. सामाजिक मान वाढेल.

loksatta analysis rice roti rate in april non veg thali still cheaper than veg thali
विश्लेषण : महागाईने बिघडवले थाळीचे गणित?
surya gochar 2024 after 30 days the fate of zodiac signs will change due to movement of sun transit surya rashifal there will be bumper benefits
३० दिवसांनंतर ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी! सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा अन् संपत्ती
On the occasion of Akshaya Tritiya the price of gold increased by Rs 1500
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी! तोळ्यामागे १,५०० रुपयांची वाढ, तरी जोमदार मागणीचा सराफांचा दावा
Navi Mumbai, a case registered, young woman suicide case
नवी मुंबई : युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर चार महिन्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Tax Relief, limit for estimated tax,
कर समाधान : अनुमानित करासाठी वाढीव मर्यादा
1st_May_Horoscope: Daily Marathi Horoscope Money Astrology Today
१ मे पंचांग: श्रवण नक्षत्रात गुरुचा राशी बदल; मेष ते मीनपैकी कुणाच्या महिन्याची सुरुवात होईल गोड?
29 April Panchang Daily Marathi Rashi Bhavishya
२९ एप्रिल पंचांग: शुक्राच्या नक्षत्रात सोमवार होणार वैभवदायी; आज लक्ष्मी मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना देणार बक्कळ लाभ
malavya rajyog 2024
मे महिन्यात शुक्र ग्रहात बनणार ‘मालव्य राजयोग’; या राशींच्या लोकांना येणार सोन्याचे दिवस, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

वृषभ:-वादा वादीचे प्रसंग टाळावेत. आर्थिक आवक चांगली राहील. उधळ पट्टीला आवार घालावी. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील. मानसिक व्यग्रता दूर सारावी.

मिथुन:-श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका. उपासनेतून मानसिक शांतता मिळेल.

कर्क:-कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करू नका. कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या. आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

सिंह:- भाऊबंधकीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी. प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. वरिष्ठांच्या कलाने घ्यावे लागेल.

कन्या:-भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगा. सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका. बुद्धिकौशल्याने कामे करावीत.

तूळ:-स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. सावधपणे व विचारपूर्वक कृती करा. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका.

वृश्चिक:-वैवाहिक सुखात सुधारणा होईल. क्षुल्लक कुरबुरी दूर साराव्यात. विरोधक डोके वर काढू शकतात. आळस झटकून कामाला लागावे लागेल. दुचाकी वाहन जपून चालवावे.

धनू:-घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला कामात मदत करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. धार्मिक कामांत मन रमवावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मकर:-मनातील इच्छा पूर्ण होईल. सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. भावंडांची नाराजी दूर करावी. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

कुंभ:-घराचे नूतनीकरण काढाल. अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

हे ही वाचा<< ३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

मीन:-कामाचे योग्य नियोजन करावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. मैत्रीत वितुष्टता आणू नका. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर