Premium

१ ऑक्टोबरला त्रिगही राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या दारी येईल लक्ष्मी; तुम्हाला कोणत्या रूपात धनलाभ होणार, वाचा

Trigahi Rajyog: बुध, सूर्य व मंगळ ग्रह एकत्र आल्याने १ ऑक्टोबरला त्रिगही राजयोग तयार होत आहे. हे तिन्ही ग्रह स्वभावाने वेगवेगळे आहेत.

1st October Trigahi Rajyog Budh Gochar Mangal Surya Yuti In Kanya Rashi These Three Lucky Zodiac signs Earn Crores Rupees
त्रिगही राजयोग बनल्याने 'या' राशी होतील अपार श्रीमंत (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Trigahi Rajyog Budh Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो, काही वेळा जेव्हा ग्रहांच्या भ्रमणकक्षेत एकाहून अधिक ग्रह समोरासमोर किंवा विशिष्ट स्थितीत समोरासमोर येतात तेव्हा त्यातून राजयोगाची निर्मिती होत असते. काही राजयोग हे अत्यंत दुर्मिळ व महत्त्वाचे असतात. असाच एक नशीबाला कलाटणी देणारा राजयोग कन्या राशीत तयार होत आहे. बुध गोचारानंतर कन्या राशीत तीन ग्रह एकत्र येणार आहेत. बुध, सूर्य व मंगळ ग्रह एकत्र आल्याने १ ऑक्टोबरला त्रिगही राजयोग तयार होत आहे. हे तिन्ही ग्रह स्वभावाने वेगवेगळे आहेत. सूर्य व मंगळ व्यक्तिमत्वाला झळाळी देण्याचे काम करतात तर बुध ग्रह हा बुद्धी, धन, वैभवाचा कारक मानला जातो. यामुळेच या त्रिगही योगाचा प्रभाव ज्या राशींवर त्या सर्वोतपरी यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या राशीत हे राजयोग तयार होत आहेत का पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्रिगही राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील अपार श्रीमंत

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

आपल्या राशीच्या धनस्थानी त्रिगही राजयोग तयार होत आहे. परिणामी आपल्याला येत्या काळात प्रचंड धनलाभाचे योग आहेत. गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. बँकेचे व्यवहार करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवर्जून घ्या. तुम्हाला तुमच्या शारीरिक व मानसिक सौंदर्याची चमक वाढवण्याची संधी लाभू शकते. अधिकाधिक ज्ञान प्राप्तीवर भर द्या. नवीन प्रयोगांना घाबरू नका. तुम्हाला येत्या काळात आई- वडिलांच्या रूपातून माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

त्रिगही राजयोग आपल्या राशीच्या कर्म स्थानी तयार होत आहे. धनु राशीला येत्या काळात शिक्षणाच्या निमित्ताने परदेश वारीची संधी मिळू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी शुद्ध तुमची कार्यप्रणाली सर्वोत्तम सिद्ध होईल ज्यामुळे खूप कौतुक व काही प्रमाणात पगारवाढ सुद्धा मिळू शकते. तुम्हाला वैवाहिक कटुता दूर करण्यासाठी जोडीदाराला वेळ देण्याची गरज आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात एखादी मोठी घटना घडू शकते ज्यामुळे तुम्ही एकत्रितरित्या यशप्राप्ती करू शकता.

हे ही वाचा<< शनीदेव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करणार नक्षत्र बदल; २४ दिवसांनी ‘या’ राशींचे अच्छे दिन होणार सुरु, लाभेल धन

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

त्रिगही राजयोग हा मिथुन राशीच्या चतुर्थ भावी तयार होत आहे. या काळात आपल्याला भावनिक कष्ट सहन करावे लागू शकतात पण दुःखातही आशेचा किरण म्हणून तुमचे मित्र व सहकारी तुमच्या पाठीशी असणार आहेत. याशिवाय ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही वाहन व घर खरेदी करू शकता. सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला मित्रांच्या रूपात धनलाभाचे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 1st october trigahi rajyog budh gochar mangal surya yuti in kanya rashi these three lucky zodiac signs earn crores rupees svs

First published on: 22-09-2023 at 09:42 IST
Next Story
Daily Horoscope: कर्कची जुनी येणी वसूल होणार तर ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, पाहा तुमचे भविष्य