1st To 31 August Monthly Horoscope In Marathi: ऑगस्ट महिना हा यंदा सणांचा महिना असणार आहे. ऑगस्टच्या पाहिल्याच आठवड्यात श्रावणाचा आरंभ होणार आहे. ५ ऑगस्ट श्रावण महिना सुरु होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा ऑगस्ट महिना अगदी विशेष असणार आहे. अनेक ग्रह जे वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात त्यातील काही ऑगस्ट महिन्यात सुद्धा आपले कक्षा बदलून भ्रमण सुरु करणार आहेत. सूर्य, बुध, शुक्र व मंगळ हे ४ ग्रह येत्या काळात राशी परिवर्तन करणार आहेत तर गुरु ग्रह हा नक्षत्र बदलून मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. श्रावणाच्या सुरुवातीला ५ बुध ग्रह सिंह राशीत वक्री होणार आहे. तर १६ ऑगस्टला सिंह राशीत सूर्यदेव येणार आहेत. यामुळे १६ ऑगस्टला बुधादित्य राजयोग साकारला जाणार आहे. २२ ऑगस्टला बुध कर्क राशीत जाणार आहेत तर २८ ऑगस्टला बुध कर्क राशीत मार्गी होणार आहेत. या ग्रह स्थितीमुळे येत्या काळात वृषभ व तूळ सहित पाच राशींच्या नशिबाला वेगळीच झळाळी मिळणार आहे. आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होण्यापासून ते प्रगतीच्या नवनवीन संधी लाभेपर्यंत अनेक लाभ या कालावधीत होतील. नेमक्या कोणत्या राशीला कशा स्वरूपात फायदा होईल हे आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया.

मेष ते मीन राशींचे ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य (August Monthly Horoscope)

मेष मासिक राशिभविष्य (Aries Monthly Horoscope)

एकंदरीत ग्रहमान सर्वसामान्य असले तरी मेहनत कमी पडू देऊ नका. शनीची महत्त्वाची साथ आहे. १६ ऑगस्ट नंतर रवी देखील स्वराशीत प्रवेश करेल. नोकरी व्यवसायातील कामकाज नेटाने पुढे न्यावे लागेल. खचू नका, जीवनातील चढ उतरांना धैर्याने सामोरे जाल. फार मोठे आणि अतिमहत्त्वाचे आर्थिक निर्णय लांबणीवर टाका. विद्यार्थी वर्गाला जबरदस्त मेहनत घ्यावी लागेल. लक्षात ठेवा, आज पेराल तेच उद्या उगवणार आहे. विवाहोत्सुक मुलामुलींनी अंतिम निर्णय घ्यायची घाई करू नये, विचारपूर्वक वागा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. पचन आणि उत्सर्जन संस्थेच्या कार्यात बिघाड अपेक्षित.

September 2024 Grah Rashi Parivartan in Marathi
सप्टेंबर सुरु होताच ‘या’ राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? ३ मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Venus will come from Virgo to Libra in Pitru Paksha!
पितृपक्षात कन्या राशीतून तूळ राशीमध्ये येणार शुक्र! एक दोन नव्हे तर चक्क १० राशींना धनलाभाचा योग
25th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२५ ऑगस्ट पंचांग: शुक्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी ठरेल वरदान; उत्पन्नात होईल वाढ तर नशिबाची मिळेल साथ; वाचा सुट्टी विशेष राशीभविष्य
27th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
२७ ऑगस्ट पंचांग: बाप्पाच्या कृपेने पदरात पडेल मेहनतीचे फळ, नशिबाचा कौल तुमच्या बाजूने तर नोकरीत दिसतील अनपेक्षित बदल; वाचा तुमचं राशीभविष्य
Venus Transit In Kanya
शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश! नीचभंग राजयोगामुळे उजळू शकते ‘या’ राशींचे भाग्य
Mars-Moon make conjunction 2024
पैसाच पैसा! मंगळ-चंद्राची युती निर्माण करणार ‘महालक्ष्मी योग’; ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा
After 100 years Ganesha Chaturthi will create wonderful yoga
१०० वर्षांनी गणेश चतुर्थीला निर्माण होईल अद्भुत योग, बाप्पाच्या कृपेने ‘हे’ लोक होऊ शकतात कोट्याधीश, आनंदाचे दिवस येणार

वृषभ मासिक राशिभविष्य (Taurus Monthly Horoscope)

गुरू, रवी, शनी आणि शुक्र यांच्या सहयोगाने मर्यादित उपलब्धतेतही आपली छाप पाडाल. महत्वाची कामे हातावेगळी कराल. कामकाजात उत्तम प्रगती होईल. आपला निर्धार पक्का असू द्यावा. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने घेतलेली मेहनत निश्चितच फलदायी ठरेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. त्याच्या भावी आयुष्यात देखील खूप उपयोग होईल. कृतज्ञता बाळगावी. उपवर मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळण्यास गुरुचे साहाय्य मिळेल. विवाहितांचे संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. मित्रांची मदत कराल. नातेवाईकांसाठी वेळ खर्च कराल. कामाच्या व्यापात पाठ, मणका आणि पोट यांचे आरोग्य दुर्लक्षित करू नका.

मिथुन मासिक राशिभविष्य (Gemini Monthly Horoscope)

आपल्या कर्मानुसार आपल्याला भाग्य उपभोगता येते. यानुसार फारसे ग्रहबल नसतानाही आपल्या कलागुणांची कदर केली जाईल. आपले बोलणे, वागणे याची इतरांवर छाप पडेल. विद्यार्थी वर्गाला देखील तोंडी परिक्षेत याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायातील अयोग्य गोष्टी सहन होणार नाहीत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. घर, प्रॉपर्टी संबंधीत कामाच्या हालचाली सरकारी नियमांनुसार पुढे सरकतील. कागदपत्रांचे काळजीपूर्वक वाचन करावे. छुप्या अटी वा नियम दुर्लक्षित करू नका. वडिलोपार्जित पैसा, संपत्ती यावरून भावंडांसह वाद टाळावेत. ताण, तणावामुळे श्वसनाचे विकार बळावतील. सणावाराच्या दिवसांमध्ये नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे आधार वाटेल.

कर्क मासिक राशिभविष्य (Cancer Monthly Horoscope)

ग्रहबल चांगले असले तरी प्रयत्नांशिवाय काही साध्य होणार नाही याची जाण ठेवावी. हिंमत आणि धैर्य यांच्या बळावर मोठ्या समस्या प्रयत्नपूर्वक सोडवाल. इथे आपला धोरणी स्वभाव उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाने शिक्षणातील एकेक टप्पा पार करत पुढे जायचे आहे. कला, भाषा या विषयात विशेष प्राविण्य मिळवाल. नोकरी व्यवसायात विरोधकांना चांगलीच टक्कर द्याल. त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाहीत. न्यायाच्या मार्गाने स्वतःला सिद्ध कराल. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधनास विशेष प्राधान्य द्यावे. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. पण कुठे थांबायचे हे आपले आपणच ठरवावे लागेल. अचानक घसा धरणे, लाल होणे, श्वसनास त्रास होणे अशा तक्रारी दुर्लक्षित करू नका.

सिंह मासिक राशिभविष्य (Leo Monthly Rashibhavishya)

१६ ऑगस्टला रवी आपल्या सिंह राशीत प्रवेश करेल. आत्मविश्वास वाढेल. कामातील हुरूप वाढेल. लोककार्यात हिरीरीने पुढाकार घ्याल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. कष्टाचे चीज होईल. विषयाचे आकलन चांगले होईल. नोकरी व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली यशस्वीरीतीने पार पाडाल. विवाहोत्सुक मंडळींच्या वधूवर संशोधनास यश येईल. विवाहित मंडळींनी जोडीदाराच्या कलाने घ्यावे. कौटुंबिक वातावरण हसते खेळते ठेवाल.घराचे प्रश्न, मालमत्तेच्या समस्यांवर तोड मिळेल. गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठी करावी. स्नायू, मज्जासंस्था यांच्यावर अतिरिक्त ताण पडेल. व्यायाम आणि विश्रांती गरजेची आहे.

कन्या मासिक राशिभविष्य (Virgo Monthly Rashibhavishya)

इतर ग्रहांचे पाठबळ फारसे चांगले नसले तरी गुरुबल उत्तम असल्याने अनेक बाबतीत सरस ठराल. परीक्षण आणि निरीक्षण कामी येईल. विद्यार्थी वर्गाने विषय पूर्ण समजेपर्यंत कास सोडू नये. चिकित्सक वृत्ती इथे उपयोगाची ठरेल. नोकरी व्यवसायात परदेशाशी संबंधीत कामे झटपट मार्गी लागतील. प्रवासयोग चांगला आहे. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही असेल. गुंतवणूक करताना शाश्वत मार्गाने पैसे गुंतवावेत. मित्रांना मदत करताना मानसिक समाधान वाटेल. घर, प्रॉपर्टीच्या संबंधीत व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. दमट , कुबट वातावरणात त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

तूळ मासिक राशिभविष्य (Libra Monthly Horoscope)

लाभ स्थानातील रवी मंगळाचे भ्रमण आपल्याला विशेष लाभ मिळवून देईल. आपल्या योजना यशस्वी होतील. नोकरी व्यवसायातील रखडलेली कामे मोठ्या हिमतीने मार्गी लावाल. कामाची दखल घेतली जाईल. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक बाबी अलगद सोडवाल. विद्यार्थी वर्गाच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यश मिळेल. आळस झटकावा. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जोडीदार मिळेल. पायाला जखम झाल्यास त्यात पू होऊन ती चिखळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक मासिक राशिभविष्य (Scorpio Monthly Horoscope)

नातेवाईकांच्या मदतीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. नैतिक जबाबदारीने वागाल. विद्यार्थी वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा उत्कर्ष चांगला होईल. अधल्यामधल्या परीक्षेत, सराव परीक्षेत अपेक्षित यश मिळवाल. नोकरी व्यवसायातील खाचखळगे जाणून प्रगतीच्या मार्गावरील प्रवासाची विशेष तयारी करावी. खचून जाऊ नका. विवाहोत्सुक मुलामुलींना थोडे थांबावे लागेल. विवाहित मंडळींनी वादाचा पवित्रा थोडा दूरच ठेवावा. समजूतदारपणा उपयोगी पडेल. घर, प्रॉपर्टी यांच्या संबंधीत कामात तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. घाईगडबडीत व्यवहार कदापि करू नये. दूषित पाण्यामुळे पोटाचे आरोग्य सांभाळावे लागेल. शरीरांतर्गत उष्णतेचा समतोल बिघडेल.

धनु मासिक राशिभविष्य (Sagittarius Monthly Horoscope)

स्वतः सावराल आणि दुसऱ्यालाही आधार द्याल. आपले नुसते ‘असणे’ देखील त्याला पुरेसे ठरेल. नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध करायला मिळेल. बुद्धिमत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर अतिमहत्त्वाच्या मीटिंग मध्ये सगळे मुद्दे आत्मविश्वासपूर्वक मांडाल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला फक्त गृहीत धरू नका. त्याचे मत, त्याच्या भावना यांचाही विचार करायला हवा. विद्यार्थी वर्गाच्या हिमतीला मेहनतीची जोड मिळाल्यास यशाचे शिखर लवकरच सर कराल. आत्मविश्वास बळावेल. कौटुंबिक समस्या व्यावहारिक पातळीवर सुटणार नाहीत. त्याकडे भावनिक दृष्टीनेच बघावे लागेल. नात्यातील गुंता हळुवार हाताळावा. शरीरांतर्गत उष्णतेमुळे पचनशक्तीवर परिणाम होईल.

मकर मासिक राशिभविष्य (Capricorn Monthly Horoscope)

साडेसातीच्या प्रभावाचा अनुभव येत असतानाच गुरुबळाची महती देखील प्रत्ययास येईल. त्यामुळे केलेले प्रयत्न आणि घेतलेली मेहनत मुळीच वाया जाणार नाही. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरील एकाग्रति वाढवावी. वेळापत्रकाप्रमाणे वागल्यास, स्वयंशिस्त अंगिकरल्यास यश नक्कीच मिळेल. नोकरी व्यवसायात अनेक समस्या पुढ्यात उभ्या राहतील. न डगमगता विचारपूर्वक कृती कराल. विवहितांनी एकमेकांना साथ देणे गरजेचे ठरेल. प्रॉपर्टीशी संबंधित कामामुळे नातेसंबंध बिघडू देऊ नका. गुंतवणूक करताना मागील अनुभव मार्गदर्शक ठरतील. नुकसान टाळावे. स्नायू आखडणे,

कुंभ मासिक राशिभविष्य (Aquarius Monthly Horoscope)

विवाहित मंडळींच्या सहजीवनातील सहजता विचलित होईल. आपल्याकडून समजुतदारीचे पाऊल पुढे टाकावे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करावे लागेल. आसपासची अनेक प्रलोभने आपणास ध्येयापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील. नोकरी व्यवसायात स्वबळावर मोठी झेप घ्याल. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणे सोपे नाही. हितशत्रूंचे टोमणे सध्या फक्त ऐकून घ्याल. आपल्या कामातूनच त्यांना योग्य उत्तर मिळेल. घर, प्रॉपर्टी, मालमत्ता याबाबतची कागदपत्रं काळजीपूर्वक वाचावेत. कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. सर्दी, ताप, कफ यांचा त्रास बळावेल.

हे ही वाचा<< ३१ जुलैपासून माता लक्ष्मी ‘या’ पाच राशींवर धरेल कृपेचे छत्र, होईल मोठा फायदा

मीन मासिक राशिभविष्य (Pisces Monthly Horoscope)

मनातील विचारांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. अन्यथा ते चुकीच्या मार्गावर भरकटत जातील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासातील एकाग्रता कायम टिकवावी. लहान मोठ्या परीक्षा चांगल्याप्रकारे निभावून न्याल. नोकरी व्यवसायात अनपेक्षित घटना घडतील. गोंधळून जाऊ नका. धीर धरा. ग्रहबलामुळे परिस्थितीतून मार्ग काढता येईल. विवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदारीसह मोठी आर्थिक जबाबदारी पेलावी लागेल. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची योग्य ती शहानिशा करून घ्यावी. सरकार दरबारी विलंब होण्याची, अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. छाती, पोट, ओटीपोट यांचे त्रास अंगावर काढू नका. आवश्यक ती चाचणी करून घ्यावी.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)