2 August Horoscope: ग्रहांचे सेनापती मंगळ २ ऑगस्टच्या रात्री वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. मंगळ राशी बदलताच राहूसोबत नवपंचम योग तयार होईल. हा योग १८ सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. मंगळ ग्रह राहूपासून पंचम भावात असेल, तर राहू मंगळापासून नवम भावात असेल.
ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम योग हा शुभ मानला जातो. त्यामुळे मंगळ आणि राहू हे पापग्रह असले तरी काही राशींच्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. विशेषतः मेष, कुंभसह ४ राशींची ऊर्जा वाढेल आणि धनलाभाचेही योग तयार होतील.
मेष राशी (Aries Horoscope)
मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे. २ ऑगस्टला राहूसोबत तयार होणाऱ्या नवपंचम योगामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. करिअरमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना अचानक मोठा नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येईल. तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मंगळ आणि राहूमुळे यश मिळू शकते.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
तुमच्या राशीत मंगळाचे गोचर होणार असून राहूसोबत नवपंचम योग तयार होईल. या योगामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता अधिक चांगली होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना यश मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भूतकाळातील चुका लक्षात घेऊन त्यातून शिकण्याची संधी मिळेल.
तूळ राशी (Libra Horoscope)
राहू आणि मंगळाचा नवपंचम योग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकतो. आयटी क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना राहूमुळे मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होईल. काही लोकांना अचानक गुप्त स्रोतांमधून धनलाभ होण्याचे योग आहेत.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
मंगळ आणि राहूचा नवपंचम योग तुम्हाला अधिक ऊर्जावान बनवेल. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत करताना दिसाल. करिअरमध्ये आखलेल्या योजना यशस्वी ठरू शकतात. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
