Rashi Bhavishya 2 July 2026 In Marathi : आज २ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील तृतीया तिथी असणार आहे. आज उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आणि वैधृती योग जुळून येणार आहे. राहू काळ २ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजचा गुरुवार मेष ते मीन राशींना कसा जाणार चला जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २ जुलै २०२६ ( Daily Horoscope 2 July 2026 In Marathi)
आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा.
आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.
आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामात काही बदल अचानक घडून येतील. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.
आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता, स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. स्वत:च्या इच्छेला अधिक
महत्व द्याल. अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.
आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
कौटुंबिक बाबीत गैरसमजाची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांचे विचार जाणून घ्या.
आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
कामात स्त्रियांची मदत मिळेल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलण्याने निर्धारित कामे पूर्ण कराल. नाहक खर्च होण्याची शक्यता.
आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. सहकार्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेऊ नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन धोरण समोर ठेवावे लागेल. संपर्कातून लाभ होऊ शकतो.
आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल. घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. सरळ मार्गाचा अवलंब करावा. समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा.
आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडावीत. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार आमलात आणा. समोरील उपयुक्त गोष्टींचा वापर करावा.
आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील. मनाची चलबिचलता कमी होईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.
आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. क्रोधाला आवर घालावी.
