Horoscope Today in Marathi : आज २ नोव्हेंबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. आज शुभ योग आणि आश्लेषा नक्षत्र जुळून येईल. आज अभिजात मुहूर्त ११ वाजून ४६ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे आणि राहू काळ ७ वाजून ५६ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस तुमच्या राशीला कसा जाणार जाणून घेऊ.

आजचे पंचांग व राशिभविष्य, २ नोव्हेंबर २०२६ (Horoscope Today 2 November 2026)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल.

दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगती च्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर