Daily Horoscope 2 october 2026 In Marathi : आज २ ऑक्टोबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असणार आहे. आज व्यतिपात योग आणि मृगशिरा नक्षत्र जुळून येईल. राहू काळ १० वाजून ५८ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त १२ वाजून ४ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार जाणून घेऊयात.

आजचे पंचांग व राशिभविष्य, २ ऑक्टोबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 2 october 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

अति घाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस.

दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

धावपळीचा दिवस राहील. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्राची गाठ पडेल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. फार काळजी करू नये.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल. अधिकची कामे अंगावर पडतील.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ओळख वाढवताना सावध रहा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल. प्रलोभनाला भुलू नका.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर