Mangal Shani Yuti Negative Impact on Rashi: ज्योतिषाच्या गणनेनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ आणि न्यायाचे देव शनी यांची युती होणार आहे. वैदिक ज्योतिषात हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे मानले जातात. मंगळ हा अग्नी तत्त्व आणि धाडसाचे प्रतीक आहे, तर शनी हा वायू तत्त्व आणि शिस्तीचा कारक आहे. त्यामुळे हे दोन्ही क्रूर ग्रह एकाच राशीत एकत्र आले की जीवनात उलथापालथ होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया मंगळ-शनीच्या या धोकादायक युतीमुळे कोणत्या ५ राशींनी विशेष सावध राहावे लागेल.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी ही युती कामाच्या ठिकाणी मानसिक ताण वाढवू शकते. या योगाच्या प्रभावामुळे करिअरमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे स्वभावात चिडचिड होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत विनाकारण वाद टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तयार झालेली प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ-शनी यांचे हे मिलन घरगुती आयुष्यात अशांतता आणू शकते. घरातील मोठ्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आईच्या तब्येतीबद्दल चिंता वाढू शकते. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी नीट तपासा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी ही युती आरोग्य आणि लपलेल्या शत्रूंच्या बाबतीत त्रासदायक ठरू शकते. अचानक खर्च वाढल्यामुळे बजेट बिघडू शकते. पोट किंवा हाडांशी संबंधित जुने आजार पुन्हा त्रास देऊ शकतात. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, परत मिळण्याची शक्यता कमी आहे. शत्रूंच्या हालचालींकडे लक्ष ठेवा आणि गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ भाऊ किंवा मित्रांसोबतच्या नात्यात दुरावा आणू शकतो. धाडस कमी झाल्यासारखे वाटेल आणि आत्मविश्वास डळमळू शकतो. गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय घेतल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अजिबात योग्य नाही. संयम ठेवा आणि कोणतेही धोकादायक काम हाती घेऊ नका.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी ही युती आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण करू शकते. मनात अज्ञात भीती आणि चिंता कायम राहू शकते. वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या खासगी नात्यांना खराब करू नका.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
