Premium

२०२४ मध्ये शनी मार्गी व गुरु-चांडाळ योग ‘या’ राशींच्या प्रगतीचा वेग वाढवणार! नवीन वर्षात मिळेल लक्ष्मीकृपा

2024 Lucky Zodiac Signs: दोन्ही ग्रह बदलांनुसार वर्षाची सुरुवात काही राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला कोणत्या राशींना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो हे पाहूया.

2023 These Four Rashi Get Lakshmi Blessing With Shani Margi Guru Chandal Yog Finishing You Can Earn Huge Money Too
२०२४ मध्ये 'या' राशींना मिळणार माता लक्ष्मीची कृपा (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Lucky Zodiac Signs Of 2024: २०२३ चे शेवटचे तीन महिने आता शिल्लक आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक कालावधीने प्रत्येक ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. २०२३ च्या सुरुवातीला शनीचे या वर्षातील सर्वात मोठे गोचर झाले होते. शनिदेव तब्बल ३० वर्षांनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश घेऊन स्थिर झाले होते. यानंतर वर्षभरात शनीचा अस्त व पुन्हा उदय झाला होता आणि आता वर्षाच्या शेवटी शनीदेव नोव्हेंबरमध्ये मार्गी होणार आहेत. शिवाय या वर्षात एप्रिलमध्ये गुरूचे सुद्धा महागोचर झाले होते. आता ऑक्टोबरच्या शेवटी गुरु व राहूची युती संपून गुरु-चांडाळ योग संपुष्टात येत आहे. या दोन्ही ग्रह बदलांनुसार वर्षाची सुरुवात काही राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला कोणत्या राशींना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो हे पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये ‘या’ राशींना मिळणार माता लक्ष्मीची कृपा

मेष रास (Aries Rashibhavishya)

मेष राशीला २०२४ मध्ये आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. नव्या वर्षात नोकरीच्या बाबत बदलाचे संकेत आहेत. तुम्हाला तुमच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त होऊ शकते व यासाठी सर्वाधिक मदत तुमच्या वरिष्ठांची लाभू शकते. पदोन्नत्तीसह पगारवाढीचे सुद्धा योग आहे. तुम्हाला आर्थिक मिळकत वाढवण्यासाथीचे स्रोत वाढू शकतात.

कन्या रास (Virgo Rashibhavishya)

२०२४ मध्ये कन्या राशीच्या आयुष्याला वेग मिळू शकतो. तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा कालावधी योग्य असणार आहे. तुमच्या खांद्यावरील जबाबदारी वाढल्याने ताण-तणाव वाढू शकतो पण त्यामुळेच तुम्हाला नव्याने गोष्टी करून पाहायला मिळू शकतात व ऊर्जा-उत्साह वाढू शकतो. धनदौलत वाढल्याने बँक बॅलन्स मजबूत होईल आणि कर्जातून मुक्ती मिळू शकते.

तूळ रास (Libra Rashibhavishya)

तूळ राशीसाठी २०२४ मध्ये आनंदाच्या घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात नवीन लोक जोडले जातील. तुम्हाला परदेशात जाण्याची एखादी मोठी संधी चालून येऊ शकते. तुम्हाला वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीची संधी मिळू शकते. तुम्ही आर्थिक मिळकतीसह बचत व गुंतवणुकीवर सुद्धा भर द्यायला हवा.

हे ही वाचा<< पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर विघ्नराजाची कृपा बरसणार; आजपासून तुम्हाला कसा होईल फायदा?

वृश्चिक रास (Scorpio Rashibhavishya)

वृश्चिक राशीच्या कुंडलीत नव्या गोष्टींची सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. आयुष्यात आलेली मरगळ झटकून टाकता येईल. करिअरसह तुम्हाला वैवहिक आयुष्यात सुद्धा प्रेम व प्रगती अनुभवता येईल. तुमचे आर्थिक बळ वाढून एखादी जुनी इच्छा पूर्ण करता येऊ शकते. कायदेशीर खटले मार्गी लागू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2023 these four rashi get lakshmi blessing with shani margi guru chandal yog finishing you can earn huge money too svs

First published on: 03-10-2023 at 14:27 IST
Next Story
१७ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ चार राशींना होणार अपार धनलाभ? सूर्य-बुधदेवाच्या युतीने होऊ शकते उत्पन्नात प्रचंड वाढ