Rashi Bhavishya 30 december 2025 In Marathi : आज ३० डिसेंबर २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. त्याचबरोबर सिद्धी योग जुळून येईल आणि भरणी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ २ वाजता सुरु होईल ते ४ वाजून १३ मिनिटांपर्यंत असेल. अभिजित मुहूर्त १२ वाजून ०३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज पुत्रदा स्मार्त एकादशी असणार आहे. तर आजच्या एकादशीचा तुम्हाला कोणत्या रूपात होणार लाभ जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ३० डिसेंबर २०२५ (Dainik Rashi Bhavishya In Marathi 30 December 2025 )

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर