2025 Astrology Predictions for Number 1 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल हेसुद्धा तुम्ही अगदी सहज जाणून घेऊ शकता. तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे. तर येणारे २०२५ हे वर्ष ‘मूलांक १’ साठी कसे जाणार? त्यांच्या व्यवसाय, आर्थिक, करिअर, नोकरी, कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काय बदल होणार हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

तर ज्यांची जन्मतारीख १,१०,१९ व २८ आहे, अशा व्यक्तींचा मूलांक १ असतो. तर २०२५ या वर्षाचा मूलांक जर तुम्ही काढला तर त्याची बेरीज ९ येते. ९ या संख्येवर मंगळ ग्रहाचा अंमल असतो, त्यामुळे ९ बरोबर १ मूलांकाचा प्रवास अधिक मंगलमय होईल. तुमच्यातील आत्मविश्वास हाच तुमचा खरा मार्गदर्शक ठरेल. फक्त राग, क्रोध, साहस, शौर्य याचा उपयोग मोजून आणि मापून करावा लागेल. थोडक्यात काय, तर अतिरेक टाळावा लागेल.

Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mangal Margi 2025
१८ दिवसानंतर बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मंगळच्या सरळ चालीमुळे धनाने भरेल झोळी; तुमची रास आहे का नशीबवान?
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Virgo Horoscope Today
Virgo Horoscope Today : मौनी अमावस्येचा दिवस कन्या राशीला देणार पैसा, प्रेम अन् सुखाचे क्षण; जाणून घ्या कन्या राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस

हेही वाचा…India 2025 Astrology Predictions: भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? चढाओढ-स्पर्धा ते सोन्या-चांदीचा वाढत राहणारा भाव… वाचा उल्हास गुप्तेंचा अंदाज

खरेदी-विक्री व्यवहारात फायदा

विशेषतः प्रेम प्रकरणात सावध राहावे लागणार आहे. वचन अथवा शब्द देऊन स्वतःची कोंडी होणार नाही, ही दक्षता घेणे खूपच गरजेचे ठरेल. या वर्षात खूप जास्त रखडलेल्या गोष्टींना चालनासुद्धा मिळेल. जमीन, शेती, खरेदी-विक्री व्यवहारात नक्की फायदा होईल. मात्र, कागदपत्रे नीट तपासून घेऊन, कायद्याची चौकट सांभाळणेसुद्धा तितकेच गरजेचे ठरणार आहे.

नोकरी-धंद्यात बदल करण्याची संधीसुद्धा तुम्हाला लाभेल. पण, यादरम्यान घाईगडबडीने निर्णय घेणे टाळा. एकंदरीत वर्षभरात मे महिन्यानंतरचे पुढील सहा महिने आर्थिक व मानसिकदृष्ट्या चांगले जातील. खेळ, क्रीडा क्षेत्रात उत्तम यश लाभेल. राजकारणात, सामाजिक क्षेत्रात आपण घेतलेल्या लहान-मोठ्या निर्णयाचे मनापासून स्वागत होईल. १,४,५ व ७ या मूलांकाच्या व्यक्ती मैत्रीचा हात पुढे करतील. अशावेळी त्याचे हस्तांदोलन स्वीकारा, ते तुमचा सन्मान करतील, त्यातून नवी सुरुवात होईल व जीवनाची योग्य दिशा ठरेल. तर आज आपण या लेखातून मूलांक १ चे २०२५ हे वर्ष कसे जाईल याचा अभ्यास केला; तर पुढील लेखात आपण ‘मूलांक २’ चे २०२५ हे वर्ष कसे जाईल हे पाहणार आहोत.

Story img Loader