2026 Political Future India and Global Astrology Predictions : उद्या मध्यरात्री २०२५ या वर्षाचा निरोप घेऊन आपण सगळे नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. २०२६ हे नवीन वर्ष कसं असेल, याबद्दल प्रत्येकाला जाणून घेण्याची नक्कीच भरपूर उत्सुकता असणार. तर नवीन वर्षातील ग्रहस्थितीने राजकारणात कोणते बदल होतील, शेअर मार्केटमध्ये तेजी असेल की, मंदी याचा संख्याशास्त्राद्वारे घेतलेला हा आढावा…

२०२६ या वर्षाच्या संख्येतील अंकांची बेरीज २+०+२+६ = १० अशी येते. जेव्हा एक या संख्येवर शून्य येते, तेव्हा त्या संख्येचे वर्ष शुभदायक असते. त्याउलट दोनवर येणारे शून्य त्रास आणि वेदनादायक ठरते. थोडे मागे वळून पाहिलेत, तर करोनाकाळात झालेला मानवी संहार आपल्यातील कोणालाच कधीही विसरता येणार नाही. त्याबाबत संख्याशास्त्राचा एक साधा नियम आहे. ज्या ज्या अंकावर शून्य येतं, त्या अंकाच्या गुण-दोषांची वाढ दिसून येते. दोन अंकावर येणारे शून्य भीषण स्फोटक ठरते. पण, येणाऱ्या नवीन वर्षाच्या संख्येतील अंकांच्या बेरजेतील एक या संख्येवर येणारे शून्य नक्कीच शुभदायक ठरणार आहे. एकदंरीत जागतिक पातळीवर उत्साही आनंदी वातावरण राहणार आहे.

सरह‌द्दीवर चकमकी, शेअर मार्केटमध्ये तेजी

२० व्या शतकातून प्रवास करताना २ वर येणारे शून्य मानसिक स्थितीत बदल करणार आणि त्याचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार. माणसा- माण‌सातील सहनशीलता कमी होत जाईल, माणूस वेगाने जगताना आपला आनंद हरवू लागेल; पण तरीही २०२६ त्यातल्या त्यात समाधानी जाईल. भारतातील राजकारणात फेरबदल होण्याची शक्यताही तितकीच दिसून येईल. नवीन वर्षात तरुण वर्ग राज‌कारणाकडे आकर्षित होईल, तर सरह‌द्दीवर चकमकी वाढतील. शेअर मार्केटमध्ये जून २०२६ पर्यंत तेजीचे वातावरण दिसून येईल.

मंगळाची अंतर्दशा यशाचा आलेख उंचावणार

उध्दव ठाकरे यांच्या पत्रिकेत शनी सप्तमात सरकला आहे; तो चंद्र राशीशी षडाष्टक करीत आहे; त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. दशमात येणारा वक्री गुरु राजकारणात फायद्याचा ठरेल. गुरु महादशेत मंगळाची अंतर्दशा आधीपेक्षा यशाचा आलेख उंचावेल.

सुरु होणार ठाकरे बंधूंचा राजकीय प्रवास

२०२६ मध्ये उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची साथ मिळणार आहे. राज ठाकरे यांची जन्मतारीख १४ जून १९६४ अशी आहे. त्यामुळे त्यांचा मूलांक ५ आणि भाग्यांक ८ आणि यांच्या नावातील अक्षरांची बेरीज केल्यावर येणारा एकांक १ येतो.

RAJ + THACKERAY

—————————-

211 + 451325211

4 + 24 = 28 = 2 + 8 = 10 = 1

त्यामुळे त्यांनाही हे वर्ष राजकीय दृष्टिकोनातून लाभदायक जाईल. त्यांच्या वक्तृत्वाने महाराष्ट्रात एक वेगळे चैतन्य निर्माण होईल. एकूण ठाकरे बंधूंचा राजकीय प्रवास नव्या जोमाने यशाकडे कूच करणारा असेल.

सत्ता नाही, लोकप्रियता

राहुल गांधी यांची जन्मतारीख १९ जून १९७० आहे. तर आता त्यांच्या जन्मतारखेचा मूलांक आणि भागांक काढूयात…

मूलांक

१ + ९ = १०
१० = १ + ० = १ येतो.

भाग्यांक

१+९+६+१+९+७+० = ३३
३३ = ३+३+ = ६ असा येतो.

नावाची स्पंदने

R A H U L G A N D H I
2 1 5 6 3 + 3 1 5 4 5 1
—————————–
१७ + १९ = ३६

३६ ही नांवाची स्पंदने आयुष्यात नेहमीच वादळ निर्माण करतील. राहुल नांवाची स्पंदने ८ येतात त्यामुळे त्यांना हवे तसे यश प्राप्त करता येत नाही. २०२६ मध्ये त्यांना लोकप्रियता लाभली तरीही सत्ता मात्र त्यांच्या हाती येणार नाही…

शनीचे भ्रमण देणार त्रास

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावातील अक्षरांची बेरीज केल्यावर येणारा ५ हा भाग्यांक त्यांच्या नावाची स्पंदने दाखवून देतो…

N A R E N D R A  M O D I
5  1  2 5 5 4 2 1   4 7 4 2
———————  ————-
        = 25         +   16   =    41

41 = 4 + 1= 5 हा येणाऱ्या २०२६ या वर्षाच्या संख्येचा उत्तम एकांक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना हे वर्ष उत्तम जाईल. यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाग्यात येणारा कर्क राशातील गुरु आधिक बलवान ठरेल. पण, मंगळ महादशेतील बुध केतूची अंतर्दशा आणि पंचमात असलेला राहू आणि त्यावरून शनीचे अंशात्मक भ्रमण जून २०२६ मध्ये त्रास देऊ शकते.

कुंभ राशीच्या साडेसातीची झळ

देवेंद्र फडणवीस यांची जन्म तारीख २२ जुलै १९७० अशी आहे. त्यांच्या जन्मतारखेचा अंकांची बेरीज केल्यावर १ हा भाग्यांक समोर येतो.

४ + ७ + ८ = १९ = १ + ९ = १० = १

येणाऱ्या २०२६ या वर्षाच्या संख्येचा एकांक १ येतो; जो देवेंद्र फडणवीस यांचा मूलांक ४ आणि भाग्यांक १ चा उत्तम मित्र आहे. त्यांच्या जन्म पत्रिकेत दशमात आलेला वक्री गुरु त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात उत्तम साथ देईल. मात्र त्यांच्या कुंभ राशीला साडेसातीची झळ बसत आहे. त्यामुळे माणसे पारखून घ्यावीत. स्तुती पाठकापासून सावध असावे, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. या वर्षी परिश्रम, साहस यांची कसोटी लागणार आहे. २०२६ अखेर अति उच्चपदाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल..

एकूण २०२६ मध्ये महाराष्ट्रात राजकारणाचे वेगळे वारे वाहू लागतील एवढे तर नक्की