Aajche Rashi Bhavishya 17 February 2026 In Marathi : आज १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावस्या असणार आहे. त्याचबरोबर परीघ योग जुळून येईल आणि धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे.

तसेच आज दर्श अमावस्या असणार आहे. तसेच उद्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही दृष्टीकोनातून ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या ग्रहणासोबतच सोमवती अमावास्येचा प्रभाव आणि पंचक काळ यांचा दुर्मिळ संयोग जुळून येईल. तर तुमच्या राशीसाठी आजचा दिवस शुभ ठरेल की अशुभ जाणून घेऊया…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, १७ फेब्रुवारी २०२६ (Daily Horoscope 17 February 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे संभवतात. नसते साहस करू नका.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

कामा निमित्त बराच प्रवास करावा लागेल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आलेल्या संधीचे सोने करावे.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. योग्यायोग्याची खात्री करावी. तुमचा अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

वाहन विषयक कामे निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांति जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

चांगला आर्थिक लाभ होईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मुलांची काळजी लागून राहील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर