2026 Horoscope Rahu Transit: राहू यावर्षी १८ मे, रविवार या दिवशी कुंभ राशीत गेले असून ४ डिसेंबर २०२६ पर्यंत ते तिथेच राहतील. शनीही राहूपासून दुसऱ्या भावात संचार करत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार राहूमुळेच ग्रहण होते आणि येणाऱ्या २०२६ वर्षात काही राशींना या प्रभावामुळे अडचणी जाणवू शकतात. या काळात आर्थिक तंगी, शारीरिक त्रास, व्यवसायात नुकसान अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
२०२६ मध्ये वृषभ, सिंह यांसह ६ राशींनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. या राशींना खर्च वाढणे, कामांमध्ये अडथळे आणि घरगुती तणाव यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे २०२६ मध्ये राहूच्या गोचराचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
येणाऱ्या वर्षात वृषभ राशीने राहूपासून सावध राहणे गरजेचे आहे. राहूच्या प्रभावामुळे नोकरीत अडचणी येऊ शकतात आणि उत्पन्न कमी होण्याची शक्यता राहील, त्यामुळे मनात चिंता वाढू शकते. या काळात कमाई कमी आणि खर्च जास्त होऊ शकतात, ज्याचा थेट परिणाम आर्थिक स्थितीवर दिसेल. व्यवसाय करत असाल तर निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील, नाहीतर नुकसान होऊ शकते. घरगुती समस्या देखील मधूनमधून त्रास देऊ शकतात. तसेच, आवश्यक कामांमध्ये अडथळे येऊन तणाव वाढण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Horoscope)
साल २०२६ हे सिंह राशीसाठी राहूच्या प्रभावामुळे थोडे कठीण जाणारे आहे. कामाच्या ठिकाणी होत असलेली कामे अडू शकतात किंवा बिघडू शकतात, त्यामुळे मनात चिंता वाढू शकते आणि आवश्यक कामे पूर्ण होण्यात उशीर होऊ शकतो. आर्थिक बाबतीतही सावध राहण्याची गरज आहे, कारण धनलाभाची संधी कमी मिळू शकते. त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. खर्चही वाढतील आणि उत्पन्न व खर्च यामध्ये संतुलन ठेवणे महत्त्वाचे ठरेल. घरातील वातावरणही तणावपूर्ण राहू शकते, ज्यामुळे मन अस्वस्थ राहील. कोणत्याही वाद-विवादापासून स्वतःला दूर ठेवणे योग्य ठरेल.
कन्या राशी (Virgo Horoscope)
येणाऱ्या वर्षात कन्या राशीने आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. राहूचा परिणाम तुमच्या जीवनावर अडथळे निर्माण करू शकतो, त्यामुळे पूर्ण वर्ष सावध राहणे गरजेचे आहे. या काळात व्यवसायात खूप प्रयत्न आणि मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत तर निराशा येऊ शकते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त राहू शकतात. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे आणि धोकादायक निर्णय घेण्यापासून दूर राहणे चांगले. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. विरोधकांची संख्या वाढण्याचेही संकेत आहेत.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
साल २०२६ मध्ये वृश्चिक राशीनेही राहूपासून सावध राहणे गरजेचे आहे. तुमचा एखाद्या जवळच्या व्यक्ती, प्रियजन किंवा मित्रासोबत वाद होऊ शकतो, ज्यामुळे नातेसंबंधात अंतर येण्याची शक्यता आहे. व्यापारातही फायदा कमी मिळेल, त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. कामकाजासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते, पण तरीही अपेक्षित लाभ न मिळाल्याने निराशा येऊ शकते आणि खर्चही वाढू शकतात. व्यवसायात संघर्ष अधिक करावा लागू शकतो.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
राहूच्या प्रभावामुळे येणाऱ्या वर्षात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीराशी संबंधित त्रास होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विविध कारणांमुळे तणाव राहू शकतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी चालू असलेल्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात, त्यामुळे धीराने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीतही सावध राहणे महत्वाचे आहे, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात.
मीन राशी (Pisces Horoscope)
साल २०२६ मध्ये मीन राशीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी किंवा कामातून मिळणारे उत्पन्न साधारण राहील, पण खर्च जास्त वाढू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च याकडे नीट लक्ष देणे आवश्यक आहे. या काळात एखादी अप्रिय घटना घडू शकते, ज्यामुळे मनात चिंता आणि मानसिक तणाव वाढू शकतो. तुम्ही कोणत्याही वाद-विवादापासून दूर राहिलेलेच चांगले, नाहीतर पुढील काळात समस्या वाढू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
