AI Prediction for 2026: दर काही दशकांनी मानवजातीसमोर तंत्रज्ञानातील एक मोठा बदल येतो. १९६५ मध्ये संगणक क्रांती झाली, १९९५ मध्ये इंटरनेटचा काळ सुरू झाला आणि २०२५ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा मोठा बदल ठरला. २०२६ हे वर्ष असे पहिले पूर्ण वर्ष आहे, ज्यामध्ये या बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
शनी हा हळूहळू फिरणारा ग्रह असून तो शिस्त, जबाबदारी आणि दीर्घकालीन परिणामांशी संबंधित मानला जातो. या काळाची दिशा ठरवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. सुरुवातीला त्याचा प्रभाव फारसा मोठा वाटत नाही, पण एकदा त्याचे परिणाम दिसू लागले की ते कायमस्वरूपी ठरतात. आधीच्या तांत्रिक क्रांतींमध्ये जसे बदल दिसले होते, तसेच दीर्घकालीन बदल पुन्हा होत आहेत; मात्र यावेळी ते अधिक वेगाने, मोठ्या प्रमाणावर आणि अधिक व्यापक पातळीवर घडत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) वाटचाल आता प्रगत टप्प्याकडे सुरू झाली आहे. २०२६ चे वैशिष्ट्य नवीन शोध नसून त्याचे परिणाम आहेत, त्यामुळे एआयच्या वापराचे परिणाम आता सर्वदूर अनेक क्षेत्रांमध्ये दिसू लागतील. अनेक वर्षांपासून उभ्या केलेल्या विविध क्षेत्रांतील प्रणालींवर आता सतत दबाव येत आहे आणि त्यांची कसोटी लागते आहे. काही संस्था, संघटना आणि व्यक्ती या बदलांशी जुळवून घेतील, तर काही जुळवून घेऊ शकणार नाहीत.
AIच्या क्षेत्रामुळे घडून येत असलेल्या बदलाचा जागतिक सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे. अमेरिका, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि भारत यांसारखे देश त्यांच्या अणु क्षमतेचा विस्तार आणि आधुनिकीकरण करत राहण्याची शक्यता आहे. पारंपरिक शस्त्रसाठ्याबरोबरच आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, स्वयंचलित ड्रोन आणि प्रगत देखरेख प्रणाली यांचा संरक्षण धोरणांमध्ये वाढता वापर होत आहे. नवीन तंत्रज्ञान सार्वजनिक पातळीवर समोर येऊ शकते, ज्यामुळे नैतिकता, संघर्ष वाढण्याची शक्यता आणि भविष्यातील युद्ध कसे असेल याबाबत चर्चा अधिक तीव्र होऊ शकते.
AI, सायबर क्राइम आणि हॅकिंग
युरोपच्या काही भागांमध्ये आणि चीनमध्ये शिक्षण क्षेत्रात AI ची भूमिका अधिक महत्त्वाची होत जाईल, त्यामुळे शिकण्याच्या पद्धतीत दीर्घकालीन मोठे बदल वेगाने घडू शकतात.
जागतिक पातळीवर ऑटोमेशन आणि AI मुळे वाढणाऱ्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर अनेक सरकार, कामगार कायदे आणि सामाजिक सुरक्षा नियमांचा पुन्हा विचार करू शकतात.
मनोरंजन क्षेत्रावर AI चा परिणाम
या बदलाचा दबाव सर्वात आधी जाणवणाऱ्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे मनोरंजन क्षेत्र. मोठ्या कंपन्यांचे विलीनीकरण, खरेदी-विक्री आणि महत्त्वाची भागीदारी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नव्या आणि उदयोन्मुख कलाकारांना अनपेक्षित मोठी संधी मिळू शकते. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत काही जुने आणि प्रसिद्ध चेहरे प्रकाशझोतातून दूर जाताना दिसू शकतात, ज्यामुळे एका प्रभावी युगाचा शेवट होत असल्याचा संकेत मिळू शकतो.
अधिक खोल स्तरावर पाहिले तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील काम करण्याची पद्धतच बदलत आहे. चित्रपट, संगीत, कला आणि डिजिटल सामग्री आता पारंपरिक प्रमाण किंवा जास्त खर्चावर अवलंबून राहिलेली नाही. पूर्वी मोठी टीम आणि भरपूर आर्थिक गुंतवणूक लागणारे प्रकल्प आता लहान आणि वेगात काम करणारे गट AI साधनांच्या मदतीने तयार करू शकतात, त्यामुळे लवचिकता आणि वेग यांना अधिक महत्त्व मिळत आहे. करिअरमध्ये वेगाने बदल होत आहेत आणि जे लवकर पाऊल उचलतात त्यांना जास्त प्रभाव मिळत आहे.
जुलै ते सप्टेंबर हा काळ जागतिक मनोरंजन क्षेत्रासाठीही खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कंपन्यांचे एकत्रीकरण वेगाने होऊ शकते. मोठ्या आर्थिक करारांची पूर्तता होऊ शकते. तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणाऱ्या सर्जनशील कामांना अधिक पाठबळ मिळू शकते. काही प्रकल्पांना अनपेक्षितपणे मोठे लोकसमर्थन मिळू शकते, तर काही नवीन कलाकार अचानक प्रसिद्धी मिळवू शकतात.
-विक्रम चंदीरामानी
