20th April 2024 Panchang & Rashi Bhavishya: २० एप्रिल २०२४ ला चैत्र शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज शनिवार असून रात्री १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत आज द्वादशी तिथी कायम असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र पंचांगानुसार आज मध्यरात्री २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत ध्रुव योग कायम असेल. शनिवारी दुपारी २ वाजून ४ मिनिटांपर्यंत पूर्वाफाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. २० एप्रिलला वामन द्वादशी साजरी होणार आहे. तुमच्या राशिनुरूप आजच्या दिवशी तुम्हाला कसे फळ प्राप्त होणार यावर एक नजर टाकूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० एप्रिल पंचांग व राशी भविष्य

मेष:-उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबात तुमचा दबदबा वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधाल.

वृषभ:-करमणुकीत जास्त वेळ घालवाल. जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवक जावक यांचा मेळ घालाल.

मिथुन:-क्षणिक सुखाने खुश व्हाल. कामाचा वेग वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

कर्क:-आवडीच्या कामांवर भर द्याल. सरकारी कामे मार्गी लागतील. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्याचा प्रथम विचार करावा. मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल.

सिंह:-मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. उगाच काळजी करत बसू नये.

कन्या:-मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. धार्मिक कामात सहभाग घ्याल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल.

तूळ:-अचानक धनलाभ संभवतो. कामात गतीमानता लाभेल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. घाई -घाईने कामे उरकू नका. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

वृश्चिक:-पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल.

धनू:-अनाठायी खर्च वाढू शकतो. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्या.

मकर:-श्रम व दगदग वाढू शकते. पित्त विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू देऊ नका. जवळचे मित्र भेटतील. प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल.

कुंभ:-कामाचे समाधान लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य घेता येईल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत होईल. आत्मविश्वास बाळगावा लागेल. उगाच चीड-चीड करू नये.

हे ही वाचा<< हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती

मीन:-स्वछंदीपणे विचार कराल. कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल. मानसिक व्यग्रता जाणवेल. जुगाराची आवड पूर्ण करता येईल. मुलांबरोबर खेळात रमून जाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20th april panchang marathi horoscope 12 zodiac signs lakshmi krupa on vaman dwadashi rashi bhavishya how you can earn money astro svs
First published on: 19-04-2024 at 19:02 IST