20th June Marathi Panchang & Rashi Bhavishya: २० जून २०२४ ला ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्रयोदशी तिथी असणार आहे, त्यानंतर चतुर्दशी तिथी असणार आहे. २० जून ला संध्याकाळी ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत साध्य योग असणार आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र असणार आहे. मेष ते मीन राशीला आजच्या दिवशी काय लाभ होऊ शकतो याचा अंदाज घेऊया..

२० जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. नवीन ओळखी होतील. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल.

16th July Panchang & Marathi Rashi Bhavishya
१६ जुलै पंचांग: आषाढी एकादशीच्या २४ तास आधी १२ राशींवर ‘या’ रूपात विठ्ठल- रुक्मिणी धरणार कृपेचं छत्र, काय सांगते तुमची रास?
3rd July Panchang & Rashi Bhavishya Marathi
३ जुलै पंचांग: रोहिणी नक्षत्रात आज ‘या’ रूपात मेष ते मीन राशीच्या लोकांना मिळतील आनंदाच्या वार्ता; तुमच्या नशिबात कसं आहे सुख?
27th June 2024 Guruvar Rashi Bhavishya Krishna Paksha Shashti Tithi mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
२७ जून पंचांग: नोकरी, व्यवसायात मिळेल लाभ, कामानिमित्त घडतील प्रवास; मेष ते मीन राशींचा असा जाईल गुरुवार
6th July Ashadh Prarambh Panchang & Rashi Bhavishya
६ जुलै पंचांग: आषाढ महिन्याच्या सुरुवातीला शनीचं वरदान; आज अचानक धनलाभासह १२ राशींना काय फायदा होईल पाहा
5th July Panchang & Marathi Horoscope
५ जुलै पंचांग: आर्द्रा नक्षत्रात आज सुखाच्या सरी बरसणार? ‘या’ राशींचा दिवस आनंदाने होईल सुरु, अमावस्या विशेष राशी भविष्य वाचा
30th June Mararthi Panchang & Rashi Bhavishya
३० जून पंचांग: शनी महाराज झाले वक्री, आजचा सर्वार्थ सिद्धी योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला कशी देईल कलाटणी?
23rd June Panchang & Rashi Bhavishya
२३ जून पंचांग: रविवारी ब्रम्ह योग बनल्याने मेष ते मीन राशींना कसा होईल लाभ? आज आर्थिक, मानसिक, शारीरिक स्थिती कशी असेल?
August Lucky Zodiac
August Lucky Zodiac : ऑगस्ट महिन्यात ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार! मंगळ गोचरमुळे मिळेल छप्परफाड पैसा

वृषभ:-दिवस आनंदात जाईल. नवीन कामात हात घालाल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल. कामे योग्य वेळेत पूर्ण करता येतील.

मिथुन:-करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. संभाषणाची आवड जोपासली जाईल. बुद्धी चातुर्यावर खुश राहाल.

कर्क:-घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कामाचा यथायोग्य आनंद मिळेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल.

सिंह:-प्रवास हसत-खेळत पार पडेल. जवळचे मित्र भेटतील. दिवस आनंदात जाईल. अधिकार्‍यांशी सल्लामसलत कराल. तरुण वर्गाशी मैत्री कराल.

कन्या:-कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सर्व गोष्टींचा सारासार विचार कराल. काही कामांचे मनन कराल. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. कमिशन मधून चांगला धनलाभ होईल.

तूळ:-दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

वृश्चिक:-मनात चलबिचलता जाणवेल. ठाम निर्णय घ्यावे लागू शकतात. धार्मिक कामात मन गुंतवावे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.

धनू:-पारमार्थिक कामात मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. अनाठायी खर्च होण्याची शक्यता.

मकर:-कामातील अडचणी दूर होतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. स्वत:वरील खर्च वाढू शकतो. घरात काही बदल करावे लागू शकतात. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:-शब्दांची धार थोडी कमी करावी लागेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गरज नसताना वस्तु खरेदी केल्या जातील. टापटि‍पेवर अधिक वेळ घालवाल. स्वभावात काहीसा उधळेपणा येईल.

हे ही वाचा<< शनी कृपेने उलट फिरणार नशिबाचे तारे; २०२५ पर्यंत या तीन राशींचे अच्छे दिन, ‘या’ रूपात घरी येईल लक्ष्मी

मीन:-शेअर्स मधून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून कमाई सुधारेल. अडचणींवर मात करता येईल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. किरकोळ जखमांपासून काळजी घ्यावी लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर