20th May Panchang & Rashi Bhavishya: २० मे २०२४ ला वैशाख शुक्ल पक्षातील उदया तिथीनुसार द्वादशी असणार आहे. सोमवारच्या दिवशी दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांपर्यंत द्वादशी असणार आहे व त्यानंतर त्रयोदशी सुरु होणार आहे. २० मे चा संपूर्ण दिवस व संपूर्ण रात्र तसेच मंगळवारी सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्रा जागृत असणार आईच. २० मे ला दुपारी १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत सिद्धी योग असणार आहे. विशेष म्हणजे सोमवारी सोम प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस काय परिणाम घेऊन आला आहे हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२० मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-दिवस प्रसन्नतेत घालवाल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील.

वृषभ:-कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमून जाईल. बर्‍याच दिवसांनी नातेवाईकांची गाठ पडेल. कामातील बदल जाणून घ्यावेत. योग्य तांत्रिक माहिती मिळवावी.

मिथुन:-मनातील नसत्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा. जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेचे तक्रार जाणवेल.

कर्क:-कौटुंबिक स्थैर्‍याचा विचार करावा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करावी.

सिंह:-इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल.

कन्या:-मानसिक चंचलतेवर मात करता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कामे घाईघाईने उरकू नका. सहकार्‍यांकडून मदत घ्यावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.

तूळ:-चांगला व्यावसायिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. मेहनतीची कामे अंगावर येतील. काही कामना पुरेसा वेळ द्यावा.

वृश्चिक:-जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका. कामात मन रमवावे. बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. अपेक्षित व्यावसायिक लाभ होईल.

धनू:-जवळचा प्रवास सावधानतेने करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना मनापासून मदत कराल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात.

मकर:-नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध वाढवा. जुन्या गोष्टींवर फार चर्चा नको. विचारपूर्वक खर्च करावा. शेअर्स मधून लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ:-आततायीपणे कोणतेही काम करू नका. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नये. अती शिस्त कामाची नाही.

हे ही वाचा<< मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग

मीन:-सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. लोकनींदेकडे दुर्लक्ष करावे. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20th may marathi panchang daily rashi bhavishya huge money profit family reunited in 24 hours mesh to meen 12 zodiac sings horoscope today svs
First published on: 19-05-2024 at 19:02 IST