Horoscope Today 22 April 2026 In Marathi : आज २२ एप्रिल २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असेल. त्याचबरोबर रात्री ८ वाजून २ मिनिटांपर्यंत अतिगंड योग जुळून येईल. सोमवारी ४ वाजून २५ मिनिटांपर्यंत आद्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजून २० मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आज आद्रा नक्षत्र जागृत होताच तुमच्या राशीला कसा होईल ला?

आजचे पंचांग व राशिभविष्य, २२ एप्रिल २०२६ (Today Horoscope 22 April 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस खेळीमेळीत जाईल. संभाषण कौशल्य दाखवण्याचा योग्य येईल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. घरगुती कामाचा ताण जाणवेल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

भावंडांची मदत घेता येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घराजवळील ठिकाणाला भेट द्याल. अधिकार्‍यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामातून चांगला धनलाभ संभवतो. किरकोळ गैरसमज दूर सारावेत. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक अडचणीतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. अपचनाचा त्रास जाणवेल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

जुनी इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. काही कामे विनासायास पार पडतील. जुगाराची आवड पूर्ण कराल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

हातातील अधिकार वापरावे लागतील. चालू कामात यश येईल. विरोधकांचा विरोध मावळेल अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक समाधान शोधा.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

हातातील कामात किरकोळ अडचणी संभवतात. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. घरात काही किरकोळ बदल करा. जुने मित्र भेटतील. संपर्कातून सहवास वाढेल.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

गरज नसेल तर प्रवास टाळावा. सामुदायिक वादात अडकू नका. खिशाला कात्री लागू शकते. जोडीदाराचे मत विचारात घ्या. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. हाताखालील लोकांकडून कामे योग्य वेळेत पार पडतील. तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. कामातूनसमाधान मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर