23rd June Panchang & Rashi Bhavishya: २३ जून २०२४ ला रविवारी ज्येष्ठ कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. आजचा संपूर्ण दिवस व २४ जूनच्या पहाटे ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी कायम असेल त्यानंतर तृतीया तिथीचा आरंभ होईल. आजच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून ३मिनिटांपर्यंत पूर्व आषाढ नक्षत्र जागृत असणार आहे. तर दुपारी २ वाजून २७ मिनिटांपर्यंत ब्रम्ह योग असणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आजच्या दिवशी नेमक्या कोणत्या राशीला कशा पद्धतीने लाभ होणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-भावनिक गोंधळ वाढवू नका. अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आज कामात फार मोठे बादल करू नका. उद्दीष्ट ठरवून ठेवा.

वृषभ:-तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक अडचण दूर होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल.

मिथुन:-कामातील दिरंगाई टाळावी. काही कामे चातुर्याने करावी लागतील. अति तत्परता दाखवू नका. वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. हटवादीपणा करून चालणार नाही.

कर्क:-प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही. मनातील इच्छेसाठी आग्रही राहाल. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. थोडीफार कसरत करावी लागू शकते. घरात नातेवाईकांची ऊठबस राहील.

सिंह:-स्वत:साठी थोडा वेळ काढावा. व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल. जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतून पडाल.

कन्या:-कामात चातुर्य दाखवावे लागेल. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. छानछोकीवर खर्च करावा लागेल. दिवस भटकंतीत घालवाल. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.

तूळ:-मनोबल वाढवावे लागेल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

वृश्चिक:-बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. हेकटपणे वागून चालणार नाही. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी.

धनू:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक गोष्टी येणार्‍या वेळेवर सोडाव्या. संपर्कातील लोक भेटतील. मनाची द्विधावस्था दूर ठेवा.

मकर:-सरळ मार्गी जमेल तेवढे करावे. मनातील इच्छेला प्राधान्य द्या. हातातील कामात यश येईल. नव्या उर्जेने कामे कराल. प्रेमप्रकरणाला उभारी मिळेल.

हे ही वाचा<< शनीदेव धमाक्यासाठी सज्ज! जून संपण्याआधी सर्वच राशीत बदलांचे वारे, १५ नोव्हेंबरपर्यंत अपार श्रीमंत होतील ‘या’ राशी

कुंभ:-संमिश्रतेचा ताण कमी होईल. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. उत्तम वाहन सौख्य मिळेल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल.

मीन:-तुमची कार्यप्रवीणता वाढेल. जोमाने नवीन काम हातात घ्याल. परोपकाराची भावना जागृत ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवा. श्रम व दगदग वाढेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23rd june marathi panchang rashi bhavishya aries to pisces horoscope bramha yog to bless health money and mental peace astrology today svs