23rd October Rashi Bhavishya & Panchang : आज २३ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी दुपारी १ वाजून १९ मिनिटांपर्यंत राहील. तर गुरुवारी पहाटेपर्यंत म्हणजेच ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. तर गुरुवार सकाळपर्यंत ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत पुनर्वसु नक्षत्र राहील. तर राहू काळ १२ वाजता सुरु होईल १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर आज मेष ते मीनचा दिवस कसा असेल हे आपण जाणून घेऊ या…

२३ ऑक्टोबर पंचांग व राशीभविष्य ( 23rd October Rashi Bhavishya & Panchang)

मेष:- जवळचा प्रवास कराल. बरेच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. भावंडांची मदत होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

वृषभ:- आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. नातेवाईकांच्या गाठी पडतील. स्वत:विषयी फाजील मत बनवू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

मिथुन:- कामातील उत्साह वाढेल. दिवस आवडीप्रमाणे व्यतीत कराल. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. उगाचच चिडचिड करू नये.

कर्क:- उत्साह मावळू देऊ नका. कौटुंबिक कुरबुरीतून मार्ग काढावा. नातेवाईकांचा रूसवा दूर करावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील.

सिंह:- महत्वाकांक्षेला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. नवीन कामात हात घालाल. आवडीची वस्तु मिळेल. जवळची व्यक्ति भेटेल.

कन्या:- खर्च जपून करावा. सारासार विचार करूनच खरेदी करावी. बोलतांना भान राखावे. आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

तूळ:- उष्णतेचे त्रास संभवतात. मनात अकारण निराशा निर्माण होऊ देऊ नका. बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. काही अचानक येणार्‍या जबाबदार्‍या पेलाव्या लागतील. धनलाभाची शक्यता.

वृश्चिक:- कामाची दगदग वाढेल. स्वत:साठी काही वेळ काढावा. थकवा जाणवेल. काही वेळेस माघार घेणे इष्ट ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.

धनू:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे अधिक कल राहील. फक्त स्वत: पुरता विचार करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतात. अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.

मकर:- कामाच्या ठिकाणी वादात अडकू नका. दिवसाची सुरुवात दमदार असेल. एक प्रकारची चुणूक दाखवाल. मनातील योजना आमलात आणाल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील.

कुंभ:- समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. धनलाभाची दाट शक्यता. कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी.

मीन:- मनात नसत्या शंका आणू नका. उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. दिवस उत्साहात जाईल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा माराल. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

Lakshmi Puja Worship Guide in Marathi| Steps for Lakshmi Puja at home
Lakshmi Puja 2024 : लक्ष्मीची पूजा कशी मांडावी? घरी व कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
Rashi Bhavishya On 31st October 2024
३१ ऑक्टोबर पंचांग: दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणाचं नशीब सोन्यासारखं चमकणार? व्यावसायिक क्षेत्रात प्रगती ते अचानक धनलाभ होणार; वाचा १२ राशींचे भविष्य
Trigrahi Yog on Dhanteras 2024:
Trigrahi Yog : १०० वर्षानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी निर्माण होणार त्रिग्रही योग, या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा!
Weekly Lucky Horoscope 28 October to 3 November 2024
Weekly Lucky Horoscope: लक्ष्मी नारायण राजयोगाने सुरु होईल दिवाळीचा आठवडा! या राशींवर होईल लक्ष्मीची कृपा, अचानक आर्थिक लाभाची शक्यता
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader