Shiv Yog: शिव योग हा अत्यंत प्राचीन आणि प्रभावशाली योग मानला जातो. या काळात केलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच साधना केल्यास या योगात विशेष लाभ मिळतो. ज्योतिषशास्त्रातही शिव योगाला मोठे महत्त्व आहे आणि त्याचा विविध राशींवर वेळोवेळी खोल परिणाम दिसून येतो.

द्रिक पंचांगानुसार, यंदा २४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी शिव योग सुरू होत आहे, जो २५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजून ५४ मिनिटांनी संपणार आहे. याच दिवसापासून काही राशींवर शिव योगाचा सकारात्मक प्रभाव सुरू होईल, जो पुढील अनेक दिवस कायम राहू शकतो.

चला जाणून घेऊया, २४ जून २०२६ नंतर कोणत्या ३ राशींच्या लोकांच्या जीवनावर शिव योगाचा शुभ प्रभाव पडणार आहे.

मिथुन रास (Gemini)

नवीन व्यवहार मिळाल्यामुळे व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. ज्येष्ठांनी या काळात खाण्यापिण्याची काळजी घेतली तर तब्येत बिघडणार नाही, उलट तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. याशिवाय एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्ही कमी किमतीत एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता, ज्याचा भविष्यात नक्की फायदा होईल.

वृश्चिक रास (Scorpio)

पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वेळेवर पूर्ण करू शकाल. याशिवाय कुठेतरी फिरायला जाण्याचा बेतही आखू शकता. वाहनसुखाबाबत बोलायचे झाल्यास, या काळात तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो. मात्र, तब्येत चांगली ठेवण्यासाठी जंक फूड आणि अनारोग्यदायी खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

धनु रास (Sagittarius)

एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. तसेच ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. या काळात तुमची धर्म आणि अध्यात्मावरील श्रद्धा वाढेल आणि तुम्ही निरुपयोगी गोष्टींपासून दूर राहाल. याशिवाय विद्यार्थ्यांचे अभ्यासात अधिक लक्ष लागेल आणि आत्मविश्वासही वाढेल. प्रेमसंबंधांबाबत बोलायचे झाल्यास, परिस्थिती तुमच्या बाजूने राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)