25th February Marathi Horoscope Panchang: आज रविवारी, २५ फेब्रुवारी २०२४ ला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा आहे. आजच दिवस गुरुप्रतिपदेचा असून पंचांगानुसार शुभ मानला जात आहे. आजच्या दिवशी काही राशींना आर्थिक तर काहींना वैवाहिक सौख्य लाभणार आहे. काहींना आपलेच विचार घातक ठरतात तर काहींना चुकीच्या सवयी नुकसानदायक ठरतील. आज मेष ते मीन पैकी कोणत्या राशीच्या नशिबात काय लिहिलंय हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-जवळचा प्रवास कराल. हातातील कामाला गती येईल. मानसिक चांचल्या जाणवेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल.

वृषभ:-कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सर्वांशी गोडीने वागाल. अपचनाचा त्रास जाणवेल. योग्य संधीची वाट पहावी. मानसिक स्थैर्य जपावे.

मिथुन:-एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. जोडीदाराच्या विचारांचे कौतुक कराल. मनातील निराशा दूर सारावी. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका.

कर्क:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. नसते साहस करायला जाऊ नका. जुगारातून नुकसान होण्याची शक्यता आहे. चोरांपासून सावध राहावे.

सिंह:-कौटुंबिक प्रश्न मार्गी लावावेत. तुमचे संपर्क अधिक दृढ होतील. कुशलतेने व्यवहार करावा. मनातून तिरस्कार काढून टाकावा. व्यापारात प्रगती करता येईल.

कन्या:-भावंडांशी मतभेद संभवतात. हातातील अधिकार योग्यवेळी वापरावेत. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. छुप्या शत्रूंवर विजय मिळवाल.

तूळ:-आर्थिक व्यवहार जपून करावेत. मौल्यवान वस्तु जपून वापराव्यात. हित शत्रूंचा त्रास संभवतो. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक शांतता जपावी.

वृश्चिक:-उष्णतेचे त्रास संभवतात. अडचणीतून मार्ग काढावा. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

धनू:-सामाजिक बांधीलकी जपावी लागेल. घरात जबाबदारीने वागाल. जुने प्रश्न पुन्हा उभे राहतील. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.

मकर:-कामाचे गणित जुळवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. काही बदल स्वीकारावे लागतील.

कुंभ:-मनातील विचारांना आवर घालावी लागेल. बौद्धिक दिमाख दाखवाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग होईल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. योग्य तर्क बांधावा.

हे ही वाचा<< माघ पौर्णिमेला धन, शक्तीसह अद्भुत योग बनल्याने ‘या’ राशींच्या दारी येईल माता लक्ष्मी; सोन्यानाण्याने उजळेल नशीब

मीन:-बढतीसाठी प्रयत्न करावेत. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कलेसाठी वेळ काढावा. सर्वांशी हसून-खेळून वागाल.

  • ज्योतिषी विद्याधर करंदीकर
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25th february marathi horoscope panchang gurupratipada six rashi to be powerful today with money love luck mesh to meen astrology svs
First published on: 24-02-2024 at 19:08 IST