Shukra Yam Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राक्षसांचा गुरु शुक्र दर महिन्याला आपली राशी बदलतो आणि याचबरोबर इतर ग्रहांशी युती सुद्धा करत असतो. सध्या, शुक्र धनु राशीत आहे; जिथे मंगळ सूर्या ग्रहाशी युती करणार आहे. शुक्र ग्रहाच्या या युतीमुळे अनेक महत्त्वाचे राजयोग निर्माण होणार आहेत. २६ डिसेंबर रोजी, शुक्र ग्रह यमाबरोबर युती करून ‘द्विद्वादश योग’ निर्माण करणार आहे. हा योग काही राशींना विशेष फायदे देऊ शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. डिसेंबरच्या अखेरीस, काही राशी एकमेकांशी जुळवून घेण्यास सज्ज आहेत. संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह शुक्र, १२ महिन्यांनंतर येणारा एक दुर्मिळ युती बनवत आहे. शुक्र आणि यम यांनी बनवलेल्या द्विद्वादश योगामुळे कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहेत जाणून घेऊया…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी शुक्र आणि यम एकमेकांपासून ३ अंशांवर असतील; ज्यामुळे द्विद्वादश राजयोग निर्माण होईल.
कुंभ
या काळात कुंभ राशीच्या मंडळींना व्यक्तींना लक्षणीय फायदे मिळू शकतात. शुक्र आणि यम यांच्या युतीमुळे निर्माण झालेला द्विद्वादश योग तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यम या राशीच्या बाराव्या आणि शुक्र अकराव्या घरात असेल. परिणामी, तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. मागील गुंतवणूक दुप्पट परतावा देऊ शकते. तुमच्या करिअरच्या बाबतीत, तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या आधारावर तुम्हाला एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. पदोन्नतीसह नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल.
मीन
द्विद्वादश योग मीन राशीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यम अकराव्या घरात आणि शुक्र दहाव्या घरात असल्यामुळे परिणामी, या राशीच्या सुखसोयींनमध्ये वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे. २४८ वर्षांनंतर येणारी ही युती तुमचा आत्मविश्वास वाढवेल. अशा परिस्थितीत, तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. तुमच्या जोडीदाराबरोबरचे जुने वाद संपतील आणि तुमचे नाते दृढ होईल.
वृषभ
शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे; त्यामुळे या संयोगाचा तुमच्यावर सर्वात शुभ परिणाम होईल. २६ डिसेंबर नंतर तुमच्या सुखसोयींनमध्ये वाढ होईल. कारण या राशीच्या गोचर कुंडलीत ग्रह नवव्या भावात बसलेला आहे. याव्यतिरिक्त, शुक्र आठव्या घरात आहे. त्यामुळे या मंडळींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे. जर तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळेल. समाजात तुमचा आदर आणि सन्मान वेगाने वाढू शकतो.
