26th July Panchang & Rashi Bhavishya: २६ जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. शुक्रवारच्या रात्री ११ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ही तिथी कायम असणार आहे. २६ जुलैला रात्री १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग असणार आहे तर दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत उत्तरा भाद्रपद नक्षत्र जागृत असेल. आजच्या दिवशी १२ राशींना नशिबाची साथ मिळणार की कष्टच वाट्याला येणार याचे अंदाज पाहूया..

२६ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-अचानक येणार्‍या समस्येवर मात कराल. घरामध्ये शांत रहा. हिशोब करताना गडबड करू नका. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.

Guru nakshatra gochar 2024 Jupiter's Nakshatra transformation
२८ नोव्हेंबरपासून पडणार पैशांचा पाऊस; गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
rahu transit in shani nakshatra uttarabhadra
राहू देणार बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
Shani nakshtra gochar 2024 | shani nakshtra parivartan 2024 s
शनि करणार राहुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश; ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब , मिळेल अपार धनलाभ
Rahu Gochar 2024 Rahu's nakshatra transformation
भरपूर पैसा कमावणार; राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Malavya Rajyog
३६५ दिवसांनी मालव्य राजयोग; सप्टेंबरपासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाचे येणार सुखाचे दिवस?
Jupiter Nakshatra Transit 202
८९ दिवसांपर्यंत गुरु देणार जगातील प्रत्येक सुख! ‘या’ राशीच्या लोकांच्या दारी येईल लक्ष्मी, मिळेल पैसाच पैसा

वृषभ:-दिवस चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराबरोबर अनमोल क्षण घालवाल. दिवस प्रेमाने भरलेला राहील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

मिथुन:-उत्तम वाचन होईल. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.

कर्क:-चांगले साहित्य वाचनात येईल. घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.

सिंह:-बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. अति विचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल.

कन्या:-जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा. सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा.

तूळ:-दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल. कामातून अपेक्षित लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल.

वृश्चिक:-सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. छंद जोपासायला वेळ काढावा लागेल. बोलताना समोरच्याचा आदर राखावा. व्यापार्‍यांनी भडक शब्द वापरू नयेत. एखादी घटना द्विधावस्था वाढवेल.

धनू:-बोलण्यातून बरेच प्रश्न मार्गी लागतील. विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल. घरातील वातावरण शांत असेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.

मकर:-ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. क्षुल्लक चूक टाळावी. नातेवाईक तुमच्यावर खुश होतील. जोडीदारासोबत उत्तम क्षण घालवाल. जवळचा प्रवास संभवतो.

कुंभ:-दिवस शांततेत जाईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आहाराची पथ्ये पाळावीत. योग्य संधीची वाट पहावी. भावंडांची साथ मिळेल.

हे ही वाचा<< पावसाचा जोर का वाढला? मुंबई- पुण्यासह राज्यात २६ जुलैसारखी स्थिती पुन्हा एकदा? ज्योतिषतज्ज्ञांची भविष्यवाणी झाली खरी

मीन:-शांतपणे बोलून कामे करून घ्या. तब्येतीत सुधारणा संभवते. घरातील गोष्टीत रमून जाल. मुलांबाबतचे मतभेद दूर होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर