26th June Panchang & Rashi Bhavishya: २६ जून २०२४ ला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. बुधवारच्या दिवशी पंचमी तिथी रात्री ८ वाजून ५६ मिनिटांपर्यंत कायम असेल. २६ जूनच्या मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांपर्यंत प्रीती योग असणार आहे. तसेच बुधवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असेल. २६ जूनला पंचक सुद्धा आहे. आजचा दिवस ग्रहमानानुसार तुमच्या राशीला कसा जाणार हे पाहूया, वाचा मेष ते मीन राशींचे आजचे भविष्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात स्थैर्य आणावे लागेल.

वृषभ:-दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत करावी लागेल. तुमच्यातील कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. स्वभावात हेकेखोरपणा वाढू शकतो.

मिथुन:-आपले विचार भरकटू देऊ नका. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल. काही आनंद क्षणिक असतील. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.

कर्क:-जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात. चुकीच्या लोकांच्यात वावरू नका. संपर्कातील लोकांच्यात आपली माणसे ओळखा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:-हातात नवीन अधिकार येतील. कामातून चांगले समाधान मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. कामाला अपेक्षित गती येईल. आजचा दिवस चांगला जाईल.

कन्या:-मनातील निराशा झटकावी लागेल. उत्साहाला खतपाणी घालावे लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

तूळ:-अकारण नैराश्य येऊ शकते. तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक:-तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल. कामाची व्यापकता वाढेल. दिवस भटकंतीत जाईल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील.

धनू:-आर्थिक कामात सावधानता बाळगावी. काही कौटुंबिक चिंता सतावतील. अति विचारात भरकटू नका. घरगुती वातावरण शांत ठेवावे लागेल. दोन पाऊले मागे घेण्यास हरकत नाही.

मकर:-वैचारिक आंदोलने जाणवतील. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जोडीदाराशी सल्लामसलत करावे. छंद जोपासण्यात वेळ घालवा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ:-मानसिक चांचल्य जाणवेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा. आर्थिक कामे जपून करावीत. कर्जाची प्रकरणे तूर्तास टाळावीत.

हे ही वाचा<< शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?

मीन:-बौद्धिक कुशलतेवर कामे कराल. व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26th june marathi panchang rashi bhavishya priti yog aries to pisces you need to be alert for money loss health love problems astrology svs