Chandra Grahan On 28 August 2026 : ऑगस्ट महिन्यात १२ ऑगस्ट रोजी पहिले तर २८ ऑगस्ट रोजी दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण तीन राशींसाठी विनाशकारी ठरू शकते. त्यामुळे काही राशींनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या आयुष्यात मोठी संकटे येण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टनंतर पुढील १५ दिवस या लोकांना पैसा, आरोग्य, नातेसंबंधांच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. चला, चंद्रग्रहणाची वेळ आणि राशींवर होणारा त्याचा तुमच्या राशीवर होणारा नकारात्मक परिणाम जाणून घेऊयात…
ऑगस्ट महिन्यातील दुसरे चंद्रग्रहण २८ तारखेला होणार आहे. ग्रहण अंदाजे सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी संपणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. पण, त्याचा राशींवर निश्चितच काही परिणाम होईल. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, चंद्र ग्रहणाचा कोणत्या राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मेष
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. आरोग्यात चढ-उतार होण्याची शक्यता आहे, आर्थिक परिस्थिती खालावू शकते आणि व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. कोणाशीही भांडणे टाळा. कुटुंबात मतभेदाचे वातावरण असू शकते.
सिंह
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे. कार्यालयात खूप तणाव असू शकतो.
कन्या
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण तुमच्यासाठी देखील त्रासदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. चालू असलेले प्रकल्प थांबण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. घाईने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात.
