Chandra Grahan 2026 On Rakshabandhan : ज्योतिषशास्त्रानुसार सण व त्यांच्याभोवती तयार होणाऱ्या ग्रहयोगांना विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, एखाद्या विशिष्ट सणाच्या दिवशी होणारे ग्रहांचे संक्रमण त्या सणाचे महत्त्व आणखीन वाढवते; ज्यामुळे व्यक्तीला लाभ किंवा नुकसान होण्याची शक्यता दिसते आहे. तर आज आपण रक्षाबंधन सणाबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यावर ग्रहणाची छाया आहे.
२०२६ मधील शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशीच होणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल, जे शनीची राशी कुंभ व शतभिषा नक्षत्रात तयार होईल. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. पण, त्याचा राशींवर परिणाम होणार आहे; ज्यामुळे काही व्यक्तींच्या समस्या वाढू शकतात आणि त्यांच्या कामात चढ-उतार येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया की, हे ग्रहण कोणत्या राशींसाठी तणाव आणि सावधगिरीचा काळ घेऊन येऊ शकते.
चंद्रग्रहणाची वेळ
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. ग्रहण २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी संपण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे, त्याचा सूतक काळ आणि त्याचे नियम दोन्ही लागू होणार नाहीत. पण, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून, काही राशींवर त्याचे परिणाम जाणवू शकतात.
कर्क
तुम्ही नवीन उपक्रम सुरू करणे टाळावे. हा काळ तुमच्यासाठी अशुभ असू शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. तुम्हाला कौटुंबिक वादांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी घाईने घेतलेले निर्णय समस्या वाढवू शकतात. पैसा व कामाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. मित्रांबरोबरही मतभेद होण्याची शक्यता आहे.
तूळ
आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका, आर्थिक व्यवहार महागडे ठरू शकतात. कोणताही नवीन उपक्रम सुरू करणे खर्चिक ठरू शकते. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देणे किंवा गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या व्यावसायिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात. न्यायालयीन खटल्यांमुळे अडचणी निर्माण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल.
धनु
तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात. कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. राग आणि घाई टाळून शहाणपणाने वागणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात आनंद नांदेल, पण कामाच्या ठिकाणीही संयम बाळगा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
