28th June Marathi Panchang & Horoscope: २८ जून २०२४ ला ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत सप्तमी तिथी असणार आहे. २८ जून रात्री ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग कायम असेल. शुक्रवारी सकाळी १० वाजून ११ मिनिटांपर्यंत भाद्रपद नक्षत्र जागृत असेल व त्यानंतर उत्तरा भाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे. आजच्या दिवशीच्या ग्रहमानानुसार आपल्या राशीच्या नशिबाचे तारे कसे चमकणार आहेत, हे पाहूया. वाचा ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांनी वर्तवलेले आजच्या दिवसाचे भविष्य

२८ जून पंचांग व मराठी भविष्य

मेष:-कामाच्या स्वरुपात काहीसे बदल करायला हरकत नाही. नवीन ओळख बनवता येईल. गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. सामुदायिक वादात लक्ष घालू नका.

Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Till Anant Chaturdashi With Bappa's blessings
अनंत चतुर्दशीपर्यंत पैसाच पैसा; बाप्पाच्या आशीर्वादाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार मालामाल
Budh and Venus Conjunction will make in scorpio
बुध-शुक्र देणार बक्कळ पैसा; युतीच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
29th August Panchang & Rashi Bhavishya
२९ ऑगस्ट पंचांग: गुरुवारी सिंह, मिथुनसह ‘या’ राशींना होणार लाभ! गुंतवणुकीतून फायदा तर व्यापारासाठी मिळेल नवा भागीदार; वाचा तुमचं राशीभविष्य
Goddess Lakshmi will give money
शुक्र देणार बक्कळ पैसा; कन्या राशीत निर्माण होणार युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची असणार कृपा
Mars-Jupiter conjunct in Taurus
आता नुसती चांदी! मंगळ-गुरूच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ

वृषभ:-काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. सतत खटपट करत राहाल. जवळच्या व्यक्तींच्या सहवासाची ओढ वाढेल. सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल. आवडत्या गोष्टीत रमून जाल.

मिथुन:-कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील. उत्तम कार्यशक्ती लाभेल. दर्जा जपण्यासाठी धडपड कराल. ईर्षेने परिस्थितीवर मात कराल. संघर्षमय स्थितीपासून लांब राहावे.

कर्क:-उपासनेत अधिक वेळ घालवावा. गैरसमजातून होणारी कटुता टाळा. आपले मत इतरांवर लादू नका. नियमित व्यायामावर भर द्यावा. शांत विचार करण्याची गरज भासेल.

सिंह:-व्यक्तिमत्व विकासावर भर द्या. अंगीभूत कलागुणांचा विकास करता येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल.

कन्या:-सामाजिक दर्जा सुधारता येईल. तुमचे अस्तित्व इतरांना दाखवून द्याल. अधिकार वाढीसाठी प्रयत्न कराल. महत्त्वाची सरकारी कामे पुढे सरकतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.

तूळ:-आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल. मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. राजकारणी धोरण आजमावून पहाल. आत्मबळाने वाटचाल करावी. पित्त विकाराचा त्रास जाणवेल.

वृश्चिक:-काही कामे उगाचच वेळ घेतील. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी लागेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. आत्मचिंतन करावे लागेल.

धनू:-जोडीदाराशी बोलताना मतभिन्नता वाढू शकते. त्याच्या मानी स्वभावाचा अचंबा वाटेल. नवीन लोक संपर्कात येतील. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागावे लागेल. घरगुती कामात गुंतून पडाल.

मकर:-कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक गोष्टीत कौटुंबिक सहकार्य घ्यावे. मनातील इच्छेला मुरड घालून पहावी. अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर करावा. कामाचा उरक वाढवावा लागेल.

कुंभ:-बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेत प्रगती करता येईल. स्पर्धेत भाग घ्याल. एककल्ली विचार करू नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.

हे ही वाचा<< ४६ दिवस या ६ राशींना पावलोपावली नशिबाची मिळेल साथ; प्रचंड पैसे, पद व प्रतिष्ठेसह मिळेल प्रवासाची मोठी संधी

मीन:-मन:शांति जपावी लागेल. फार चिडचिड करू नका. काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. शांत व संयमी विचार करावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर