28th May 2024 Panchang & Marathi Rashi Bhavishya: २८ मे २०२४ ला वैशाह कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत पंचमी तिथी कायम असेल व त्यानंतर षष्ठीला प्रारंभ होईल. द्रिक पंचांगानुसार आजच्या दिवशी सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांपर्यंत उत्तर आषाढ नक्षत्र जागृत असणार असून आजचा संपूर्ण दिवस ते २९ मेच्या पहाटे २ वाजून २९ मिनिटांपर्यंत ब्रह्म योग असणार आहे. मकर राशीतून आज चंद्र काही राशींना सुखाचे चांदणे अनुभवण्याची संधी देऊ शकतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-कामात तुमचा आवेश कामाला येईल. तांत्रिक कामात प्रगती करता येईल. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. परोपकाराचा मार्ग अवलंबाल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल.

वृषभ:-कौटुंबिक कामातून लाभ होईल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. घरगुती कामाची जबाबदारी वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. कामात क्षुल्लक अडथळे येऊ शकतात.

मिथुन:-तुमची धावपळ वाढू शकते. दिवसभर कामात व्यग्र राहाल. मनातील निराशा दूर सारावी. सर्व गोष्टी मनासारख्या होतील असे नाही. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो.

कर्क:-मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत. अति विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

सिंह:-अडचणीतून मार्ग काढता येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. काही नवीन स्वप्ने आकार घेऊ लागतील. पत्नीचा गैरसमज दूर करावा लागेल. लहानांबरोबर मजा मस्ती कराल.

कन्या:-चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. गुरूजनांची भेट होईल. अधिकारी लोकांच्यात वावराल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी केल्या जातील.

तूळ:-मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. उष्णतेचा त्रास जाणवेल. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळाव्यात. जवळचा प्रवास टाळता आला तर पहावा. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो.

वृश्चिक:-मित्रांशी मतभेद संभवतात. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. उत्साहावर पाणी पडू देऊ नका. पित्ताचा त्रास जाणवू शकतो. कौटुंबिक शांतता जपावी लागेल.

धनू:-काहीसे हट्टीपणे वागाल. अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे. नसते साहस अंगाशी येऊ शकते. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. स्वत:च्या मर्जीने दिवस घालवाल.

मकर:-नवीन गुंतवणूक खात्रीपूर्वक करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. बोलताना शब्द जपून वापरावेत. रोकठोक बोलणे टाळावे लागेल.

कुंभ:-थोडाफार डोकेदुखीचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. कारण नसताना रागराग करू नये. कोणत्याही प्रसंगी संयम सोडून चालणार नाही.

हे ही वाचा<< ३ जूनपासून ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? देवगुरुचा उदय होताच उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडून होऊ शकतात गडगंज श्रीमंत

मीन:-कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कामे स्वबळावर पूर्ण करावीत. नसत्या शंका उत्पन्न करू नका. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28th may marathi panchang tuesday bramha yog to bless 12 rashi with money love health success daily horoscope todays astrology svs
First published on: 27-05-2024 at 19:02 IST