29th March Panchang & Rashi Bhavishya: २९ मार्च २०२४ ला पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थी व पंचमी तिथी एकत्रित असणार आहे. आजचा शुक्रवार हा गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो. आजचा दिवस पंचांगानुसार शुभ नाही. आज सकाळी १० वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहूकाळ असणार आहे. आजचा दिवस विशाखा नक्षत्रात पार पडेल. शुक्रवार आज तुमच्या राशीनुसार काय फळ देऊ शकतो हे पाहूया..

२९ मार्च पंचांग: मेष ते मीन राशींचे भविष्य

मेष:-दिवस दगदगीत जाईल. थोडा वेगळा विचार करून पहावा. औद्योगिक स्थिरता सांभाळावी. कामात काही बदल करून पहावा लागेल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.

rajkot fire incident
२ दिवसात ३५ जण आगीच्या भक्ष्यस्थानी; नियमांकडे दुर्लक्ष होतंय का?
Trigrahi Yog 2024
११ दिवसांनी ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ३ ग्रहांची महायुती होताच होऊ शकतात गडगंज श्रीमंत, भाग्यवान राशी कोणत्या?
Venus Transit 2024
Shukra Gochar: या राशींचे सुरू झाले कठीण दिवस, उत्पन्नावर दिसून येईल दुष्परिणाम; जाणून घ्या, त्या राशी कोणत्या?
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
surya gochar 2024 after 30 days the fate of zodiac signs will change due to movement of sun transit surya rashifal there will be bumper benefits
३० दिवसांनंतर ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी! सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा अन् संपत्ती
budh gochar mercury transit in mesh these 3 zodiac sign get more profit astrology
येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : ५ दिवसानंतर सूर्याचं होणार संक्रमण! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; मिळेल बक्कळ पैसा
shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

वृषभ:-अधिकारी वर्गाची भेट घ्यावी लागेल. दिवस खेळकरपणात घालवाल. मनाजोगी खरेदी करता येईल. सर्वांना आपलेसे कराल.

मिथुन:-कौटुंबिक कामात गढून जाल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. उत्तम निद्रासौख्य मिळेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. जवळचे मित्र भेटतील.

कर्क:-चारचौघात कौतुक केले जाईल. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. तुमची अरसिकता दूर सारावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह:-कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

कन्या:-इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची उत्तम छाप पडेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. मुलांच्या मताचा विचार करावा. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल.

तूळ:-मनाची चंचलता वाढेल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. पित्त विकार बळावू शकतात. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आरोग्यात सुधारणा होईल.

वृश्चिक:-हातातील अधिकार वापरावेत. जोडीदाराचे कौतुक कराल. मैत्रीची घनिष्टता वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. भागिदारीतून उत्तम लाभ मिळेल.

धनू:-बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी.

मकर:-सामाजिक कामात मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवावी. इतरांना सहृदयतेने मदत कराल. उष्णतेचे विकार वाढू शकतात. खाण्या पिण्याच्या वेळा पाळा.

कुंभ:-सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. बाग-बगीच्याच्या कामात मन रमेल. अचानक धनलाभ संभवतो.

हे ही वाचा<< १३ दिवस केंद्र त्रिकोण राजयोग कायम; ‘या’ राशींना लाभतील सुगीचे दिवस; ‘या’ रूपात होईल लक्ष्मीचं आगमन

मीन:-बौद्धिक कौशल्य दाखवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. मित्रांशी मतभेद संभवतात. जोडीदाराचा उत्तम सहवास लाभेल. मनमोकळ्या गप्पा माराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर