29 May Horoscope: ज्योतिषशास्त्रात केतूला एक रहस्यमय आणि प्रभावशाली ग्रह मानलं जातं, जो अचानक घडणाऱ्या घटनांशी संबंधित असतो. सध्या केतू मघा नक्षत्रात आहे आणि २९ मे २०२६ म्हणजेच उद्या मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. ही स्थिती १ ऑगस्ट २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. केतूच्या या नक्षत्र बदलामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक बदल पाहायला मिळू शकतात.

केतूला पापी ग्रह मानलं जात असलं तरी तो नेहमीच वाईट परिणाम देतो असं नाही. अनेक वेळा त्याच्या प्रभावामुळे आयुष्यात सकारात्मक बदलही दिसून येतात. या काळात काही राशींना आर्थिक दिलासा मिळू शकतो आणि खूप दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होऊ शकतो.

मेष राशी (Aries Horoscope)

या काळात मेष राशीच्या लोकांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात, विशेषतः व्यवसायात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मात्र खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे बजेटकडे लक्ष देणं गरजेचं असेल.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ दिलासादायक ठरू शकतो. तब्येतीत सुधारणा होईल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामातही चांगले बदल दिसून येतील.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांना या गोचरामुळे नशिबाची साथ मिळू शकते. मालमत्ता, वाहन किंवा घराशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. अडकलेली कामं पूर्ण होतील आणि मित्रांची मदत मिळेल. प्रवासाचे योगही तयार होत आहेत.

तूळ राशी (Libra Horoscope)

तुला राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीत प्रमोशन किंवा उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. मात्र तब्येतीबाबत थोडी काळजी घेणं आवश्यक राहील.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ दिलासा आणि स्थिरता घेऊन येऊ शकतो. कामात येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योगही तयार होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)