2nd March 2024 Marathi Horoscope: आज २ मार्च २०२४ ला माघ महिन्यातील कृष्ण पक्ष षष्ठी तिथी आहे. आज विशाखा नक्षत्रातील दिवस हा काही राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. आज महिन्याचा पहिला शनिवार आहे. लवकरच होणाऱ्या उदयासाठी शनीदेव सज्ज होताना आज काही राशींवर त्याचा शुभ प्रभाव होऊन धनलाभ होऊ शकतो. आजच्या दिवसात दुपारी १२ वाजून १० मिनिटांपासून ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे.

मेष:-कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विषय वासना वाढू शकते. हौसेचे मोल लक्षात घ्याल.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

वृषभ:-दिवस घाईगडबडीत जाईल. खिलाडु वृत्तीने वागाल. मित्रांशी पैज लावाल. बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील. उपासनेसाठी वेळ काढावा.

मिथुन:-कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. बागबगीच्याच्या कामात गुंग व्हाल. समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

कर्क:-बौद्धिक छंद जोपासाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल. साहित्य प्रेम दर्शवाल. भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल.

सिंह:-आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत. कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो. सामाजिक संबंध जपावेत.

कन्या:-आपल्या इच्छेला अधिक महत्व द्याल. स्वत:चे म्हणणे खरे कराल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत. काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील.

तूळ:-मानसिक चंचलता जाणवेल. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी.

वृश्चिक:-व्यावसायिक लाभ सुनिश्चित करावा. मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांना खुश करता येईल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

धनू:-कामाची वेळेनुसार छानणी करावी लागेल. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे. राग आवरता घ्यावा लागेल. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी.

मकर:-धार्मिक स्थळांना भेट द्याल. तात्विक विचार मांडाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल. थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल.

कुंभ:-दिवसभर कामाचा ताण राहील. बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पहावी.

हे ही वाचा << ३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?

मीन:-बदलीची चिन्हे दिसतील. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल. कामात उर्जितावस्था येईल. वैचारिक सुसूत्रता ठेवावी. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर