Horoscope Today 3 August 2026 In Marathi : आज ३ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील पंचमी तिथी रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री १० वाजून १ मिनिटांनी उत्तराभाद्रपद नक्षत्र जागृत असेल आणि रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी सुकर्मा योग जुळून येईल. राहू काळ ७ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजात मुहूर्त १२ वाजून १९ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून १० मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, १ ऑगस्ट २०२६ (Daily Horoscope 1 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सहकार्यांची बाजू समजून घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घ्यावासा वाटेल. मित्राची चांगली मदत मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
खर्च जपून करावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. कामे नियोजनबद्ध करावीत. जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी. अघळ-पघळ बोलणे टाळावे. गोड बोलण्यावर भर द्यावा. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल. चिंतामुक्त व्हाल. हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन संधी उपलब्ध होईल. कामाची दगदग जाणवेल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
वादाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. थोडेफार मनाचेही ऐकावे. हाती घेतलेल्या कामात निष्काळजीपणा करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
नवीन तंत्र शिकून घ्यावे. व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. मेहनतीचे महत्व लक्षात घ्यावे. भाग्यावर विसंबून राहू नका. मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
संमिश्र घटनांचा दिवस. नोकरीत सहकार्यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. मनाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
व्यवसाईकांना नवीन संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारता येईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. काही परिवर्तन घडून येईल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
उत्साहवर्धक घटना घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
दिवस मजेत जाईल. आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. कौटुंबिक जबाबदार्या पार पाडाल. सुखद घटना घडू शकतात.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठ बंधुचा सल्ला घ्यावा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. वेळ जपून वापरावा. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. उगाच चिडचिड करू नका.
