3 June Panchang & Marathi Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख कृष्ण पक्षातील एकादशी व द्वादशी तिथी आजच्या दिवशी एकत्र असणार आहे. आज पंचांगानुसार भागवत एकादशी आहे तर आज रात्री १२ वाजून २० मिनिटांपर्यंत द्वादशी तिथी कायम असणार आहे. याशिवाय ३ जूनला सकाळी ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग असल्याने काही राशींच्या कुंडलीत नशीब पालटणाऱ्या घटनेचे योग आहेत. यानंतर आज दिवसभर शोभन योग असणार आहे. सोमवारी रात्री १२ वाजून ६ मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असणार आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मंगळाने वृषभ राशीत घेतलेल्या प्रवेशाचा प्रभाव सुद्धा आजपासून अन्य राशींवर दिसून येऊ शकतो. नेमकं आजच्या दिवशी मेष ते मीन राशींचं नशीब कसं बदलणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-मनातील इच्छा अधिक प्रबळ होईल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल. काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील. दिवसभर खटपट करत राहाल.

वृषभ:-कामे जलद गतीने करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो. काही बदल अपरिहार्यपणे स्वीकारावेत. स्वत:चेच म्हणणे खरे कराल.

मिथुन:-कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते. यांत्रिक उद्योगातून फायदा संभवतो. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा. तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल.

कर्क:-उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो. काही गोष्टी तडकाफडकी घडू शकतील. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.

सिंह:-जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. उगाचच मतभिन्नता दर्शवू नका. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. तुमच्यातील कार्य प्रवीणता दिसून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे.

कन्या:-काम आणि वेळ यांचा ताळमेळ घालावा. भांडकुदळ व्यक्तींचा त्रास संभवतो. तिखट व तामसी पदार्थ खाल. पोटदुखीचा त्रास संभवतो. हातातील कामात यश येईल.

तूळ:-मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत. व्यायामाची आवड पूर्ण करावी. चपळाईने कामे तडीस न्याल. मुलांशी काही गोष्टींवरून मतभेद संभवतात. अविचाराने खर्च करू नका.

वृश्चिक:-घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मानसिक शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून चांगला लाभ होईल.

धनू:-समोरील परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येईल. मनातील चुकीच्या विचारणा खतपाणी घालू नका. भावंडांचा विरोध सहन करावा लागेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. टीकेला सामोरी जावे लागू शकते.

मकर:-बोलण्याच्या भरात जबाबदारी घेऊ नका. फटकळपणे एखादा शब्द वापरला जाऊ शकतो. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. पुढचा मागचा विचार न करता वागू नका. तिखट व तामसी पदार्थ खाल.

कुंभ:-इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. हित शत्रूंचा त्रास संभवतो. अती अट्टाहास करू नका. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. इच्छा शक्तीने गोष्ट तडीस न्याल.

हे ही वाचा<< शनी जूनचे ३० दिवस करणार १२ राशींवर राज्य; मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे भविष्य वाचा, तुमच्या नशिबात धन आहे की कष्ट?

मीन:-जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका. उधार उसनवारीचे व्यवहार टाळा. स्वत:च मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता. सहकुटुंब प्रवास टाळावा. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 june panchang ashwini nakshtra bhagwat ekadashi mesh to meen rashi bhavishya weekly horoscope who will earn money on monday marathi astrology svs