Rashi Bhavishya 30 March 2026 In Marathi : आज ३० मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. त्याचबरोबर शूल योग जुळून येईल आणि मघा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ५ वाजता सुरु होईल ते ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याच्या सुरवातीला तुमच्या आयुष्यात काय घडणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ३० मार्च २०२६ (Dainik Rashi Bhavishya 30 March 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

एकमेकांना उत्तम प्रकारे समजून घ्याल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार कमी होईल. हातात नवीन अधिकार येतील.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

कर्तृत्वाची योग्य जाणीव ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींत प्रगती करता येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. तात्विक गोष्टींवर मतभेद संभवतात. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

नाटक सिनेमा पहायला जाल. छंद जोपासला वेळ मिळेल. लहान सहान दुखण्याकडे दुर्लक्ष नको. काही कामे अधिक वेळ घेतील.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. स्त्रियांशी मैत्री वाढेल. घरगुती वातावरण खेळीमेळीचे राहील. तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहील. वरिष्ठांना नाराज करू नका.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

पित्त विकार बळावू शकतात. सहकुटुंब जवळचा प्रवास कराल. निसर्गाच्या सान्निध्यात रमून जाल. सौंदर्यप्रसाधनेच्या वस्तु खरेदी कराल. तुमच्यातील चांगल्या गुणांची दाखल घेतली जाईल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक सौख्य वाढेल. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. संपर्कातील लोकांची गाठ घेता येईल. मनाची विशालता दाखवाल. उच्च रहाणीमानाची आवड जोपासाल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालावे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

मानसिक चांचल्य जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. मुलांशी मतभेद संभवतात. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. काहीसा आळशीपणा जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील. योग्य संधीची वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

उगाच चिडचिड करू नये. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. तुमचा तर्क अचूक ठरेल. अती चौकसपणा दाखवू नका.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. घरगुती वापरासाठी वस्तूची खरेदी कराल. ध्यान धारणे साठी वेळ द्यावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. कोर्ट-कचेरीची कामे निघतील.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

व्यवसाय वृद्धीकडे मार्गक्रमण करावे. मुलांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. धूर्तपणे वागणे ठेवाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर