Daily Horoscope 30 November 2024 in Marathi : आज शनिवारी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी. चतुर्दशी तिथी आज सकाळी १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल. अतिगंड योग ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच विशाखा नक्षत्र आज दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर अनुराधा नक्षत्र दिसेल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

अनुराधा नक्षत्र हे आकाशात स्थित २७ नक्षत्रांपैकी १७ वे नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्र हे बुद्धिमत्ता, शक्ती आणि संरक्षण करण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. हे यश, आनंद आणि सौभाग्य यांचे प्रतीक देखील मानले जाते.अनुराधा नक्षत्राच्या काळात विवाह, प्रवास आणि वाहन खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

३० नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

वृषभ:- संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

मिथुन:- नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.

कर्क:- घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढत राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

सिंह:- नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

कन्या:- आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.

तूळ:- कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

वृश्चिक:- मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू:- कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.

मकर:- अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कुंभ:- तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मीन:- जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader