Weekly Lucky Horoscope 31 August to 06 September 2026 : उद्यापासून सप्टेंबर महिना सुरु होईल. सप्टेंबरचा पहिला आठवडा शुभ योग आणि विशेष ग्रहस्थितीसह सुरू होणार आहे. या आठवड्यात कृष्ण जन्माष्टमी, शुक्राचे गोचर आणि अनेक विशेष ग्रहयोग पाहायला मिळतील. त्यामुळे या ज्योतिषीय घटनांचा प्रभाव काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो. या काळात लोकांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती, प्रवासाच्या संधी, नोकरीसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर, शुक्राच्या गोचरामुळे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि भौतिक समृद्धी वाढू शकते.
सप्टेंबरचा पहिला आठवडा कोणासाठी ठरणार शुभ?
मिथुन
हा आठवडा तुमच्यासाठी विशेष ठरेल. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. कुटुंबाबरोबर कौटुंबिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिसून येईल. आर्थिक लाभाची होण्याची शक्यता आहे, तुमची स्थिती मजबूत होईल. कला क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळत असल्याचे दिसते. तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आणि फायदेशीर व्यावसायिक संधींचा अनुभव येऊ शकतो.
कन्या
तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुम्ही एका मोठ्या प्रवासाला निघू शकता, जो सुखद व फायदेशीर ठरू शकतो. या काळात व्यवसायातील अपेक्षित प्रगती आणि नफा आनंद देऊन जाईल. विरोधक तडजोड करू शकतात, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तणाव कमी होईल. तुम्हाला तुमच्या नोकरी व व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात,मेहनतीचे कौतुक होईल. या आठवड्यात, तुम्हाला वाढलेला आनंद अनुभवायला मिळेल. मजबूत आर्थिक परिस्थितीसोबतच, भविष्यातील योजनाही यशस्वी होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करणे सोपे होईल.
तूळ
तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असल्याचे दिसते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही हा काळ अनुकूल असेल आणि एखादा महत्त्वाचा करार तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा सुद्धा मिळेल.
