3rd August Panchang & Marathi Rashi Bhavishya: ०३ ऑगस्ट २०२४ ला शनिवार आहे. आजच्या दिवशी कृष्ण पक्ष चतुदर्शी आहे. तर यादिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत वज्र योग राहणार आहे. तसेच सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत पुनर्वसु नक्षत्र जागृत असणार असून त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरु होणार आहे.तर राहू काळ सकाळी ९ वाजून ४ मिनिटांपासून सुरु होईल ते सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत राहील. आजच्या दिवशी अभिजित मुहूर्त ११ वाजून ५५ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज मेष ते मीन राशींपैकी कोणाच्या नशिबात सुख आहे व कोणाला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊया.

०३ ऑगस्ट पंचांग व राशी भविष्य :

Guru gochar 2024 these two zodiac signs will get a new job
आता पैसाच पैसा; आठ दिवसांनंतर गुरू ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ दोन राशींच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी अन् मानसन्मान
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
surya gochar 2024 After 364 days Sun will enter Virgo sign
नुसता पैसा! ३६१ दिवसांनंतर सूर्य करणार कन्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी
Surya Gochar 2024 | sun transit in kanya rashi
Surya Gochar 2024 : सूर्यदेवाच्या कृपेने मिळणार पैसाच पैसा! १६ सप्टेंबरपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
Mercury transit in leo three signs will get success
४ सप्टेंबरपासून नुसती चांदी! बुधाच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ramabai Ambedkar nagar rehabilitation project
रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्प : घरभाडे धनादेशाचे वाटप रखडले, धनादेश वाटपाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा

मेष:- जुन्या कामांमधून यश मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवसाच्या पूर्वार्धात रखडलेली कामे मार्गी लागतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.

वृषभ:- सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. शासनाकडून लाभाची शक्यता.

मिथुन:- घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मन काहीसे विचलीत राहील. मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल.

कर्क:- मानसिक चंचलता राहील. अति विचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. जवळचे मित्र भेटतील.

सिंह:- प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. अति कामामुळे थकवा जाणवेल. बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल. व्यापारीवर्ग खुश राहील. कामाची धावपळ वाढेल.

कन्या:- रखडलेली कामे पूर्ण करा. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील. व्यापारी क्षेत्रातील प्रयत्न फळाला येतील.

तूळ:- योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.

वृश्चिक:- नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अति घाई करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. गुंतवणुकी संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

धनू:- मानसिक शांतता लाभेल. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुने काम मार्गी लावण्याची संधी मिळेल.

मकर:- धार्मिक कामाची आवड वाढेल. जोडीदाराच्या कलाने काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. भावनात्मकता टाळावी.

कुंभ:- जोडीदाराचे म्हणणे टाळू नका. खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव आहे. नियोजना अभावी कामे रेंगाळू शकतात.

मीन:- आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल. उधारीचे व्यवहार करू नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर