3rd May Panchang & Rashi Bhavishya: आज ३ मे २०२४ रोजी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष दशमी तिथी आहे.आजच्या दिवशी शततारका नक्षत्र जागृत असून आजचा राहुकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर दुपारी २ वाजून २० मिनिटांपर्यंत ब्रम्ह योग असेल. त्यानंतर इंद्र योग सुरु होईल. चला तर जाणून घेऊ या १२ राशींचे भविष्य.

३ मे २०२४ पंचांग व राशी भविष्य

22nd June Panchang & Rashi Bhavishya
२२ जून पंचांग: मेष ते मीनपैकी ‘या’ राशींना आज नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात लाभेल लक्ष्मी कृपा; शनिवारी तुमचं नशीब कसं चमकणार?
Rahu Nakshatra Transit 2024
८ जुलैपासून लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींच्या जीवनात असेल राजयोग? १८ वर्षानंतर राहूच्या नक्षत्र बदलाने अचानक पालटू शकते नशीब
14 June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?
5th June 2024 Marathi Rashi Bhavishya Daily Astrology
५ जून पंचांग: तुम्हाला सुकर्माचे फळ देणार बुधवार; अमावास्येआधी आज मेष ते मीनपैकी तुमच्या राशीच्या नशिबात काय लिहिलंय?
Shukra Nakshatra Parivartan
७ जूनपासून शुक्रदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे उजळेल नशीब? शुक्रदेव नक्षत्र बदल करताच लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळू शकतो अपार पैसा
31st may 2024 panchang marathi horoscope mesh to meen which rashi will earn good luck money on may 2024 last day rashi bhavishya lucky and unlucky zodiac signs
३१ मे पंचांग: महिन्याचा शेवटचा शुक्रवार, मेष ते मीन राशीला कसा जाईल? तुमच्यावरही होईल का देवी लक्ष्मीची कृपा? वाचा तुमचे राशीभविष्य
29th May Panchang & Marathi Horoscope
२९ मे पंचांग: श्रावण नक्षत्रात मेष ते मीन राशींवर बरसणार सुखाच्या सरी; इंद्र योगासह तुमच्या राशीत कोणते बदल आज घडणार, पाहा
Shani Vakri 2024
साडेसाती संपणार! ३४ दिवसांनी शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे बदलेल भाग्य; ५ महिन्यात श्रीमंतीचा मार्ग खुला होऊन होऊ शकतात लखपती

मेष:- दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. काही अडचणीतून मार्ग काढता येईल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण चांगले राहील.

वृषभ:- वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरुकृपेचा लाभ उठवावा. तीर्थयात्रेचे योग येतील. दिवस खेळीमेळीत घालवाल.

मिथुन:- मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे. लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

कर्क:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा. अती भावनाविवश होऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. लहानांच्यात लहान होऊन वावराल.

सिंह:- पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कलेला पोषक वातावरण मिळेल. गोड बोलून फायदा साधून घ्याल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.

कन्या:- मुलांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. मतभेदाला खतपाणी घालू नका. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

तूळ:- मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. क्रोधाला बळी पडू नका. कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक:- प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. पत्नीचे मत विरोधी वाटेल. भावंडांचे प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक सहलीचा विचार करावा.

धनू:- कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. मत्सराला बळी पडू नका. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.

मकर:- नवीन विचारांची कास धरावी. तिखट व तामसी पदार्थ आवडीने खाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. घरात तुमचा दबदबा राहील. करमणुकीच्या कार्यक्रमात गुंग व्हाल.

कुंभ:- शांत व संयमी विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची चंचलता दूर करावी. धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक बळ वाढवावे.

मीन:- प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांमुळे मतभेद संभवतात. अती चौकसपणा दर्शवू नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर