3rd September Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज ३ सप्टेंबर २०२४ रोजी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील उदय तिथी असणार आहे. ३ सप्टेंबरला अमावस्या असणार आहे. अमावस्या तिथी मंगळवारी पहाटे ७ वाजून २६ पर्यंत राहील. त्यानंतर भाद्रपद शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सुरू होईल. तर संध्याकाळी ७ वाजून ०५ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. तसेच पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दुपारी ३ वाजून ११ पर्यंत राहील. आजचा राहुकाळ दुपारी ३ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…
३ सप्टेंबर पंचाग व राशीभविष्य :
मेष:- घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्यांच्या हातात हात घालून चला. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल.
वृषभ:- अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
मिथुन:- मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल.
कर्क:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.
सिंह:- जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.
कन्या:- आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.
तूळ:- कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकांवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.
वृश्चिक:- लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. अधिकार्यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करा. आर्थिक चिंता मिटेल.
धनू:- मदत केल्याचा आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.
मकर:- नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.
कुंभ:- मनातील निर्णय जोडीदारासमोर मांडा. तिखट शब्दांचा वापर टाळा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. जुन्या विचारांना चिकटून राहू नका.
मीन:- क्षुल्लक गोष्टी नजरेआड करा. जोडीदाराशी शांतपणे वार्तालाप करा. अती उत्साह दाखवायला जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी. उष्णतेचे त्रास संभवतात.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर