Chanakya Niti Life Lesson On Weakness : आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये आचार्य चाणक्य यांनी आपले जीवन सुखी, समाधानी व सुंदर बनवण्यासाठी अनेक लहान सहान बारकावे सांगितल्याचे मानले जाते. आचार्यांचे हे बोध आज जगभरात चाणक्य नीती रूपात प्रसिद्ध आहेत. तर या चाणक्य नीतीमध्ये माणसाच्या अशा काही सवयींचे वर्णन करण्यात आले आहे, ज्यामुळे इतर लोक त्यांचा गैरफायदा घेतात. पण, या सवयी सुधारल्याने तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यास, इतरांकडून होणारा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते.
१.”नात्यन्तं सरलैर्भाव्यं गत्वा पश्य वनस्थलीम् ।
छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः॥”
चाणक्य नीतीमधील हा श्लोक सांगतो की, माणसाने जास्त भोळे किंवा भाबडे असू नये. याचे उदाहरण देताना चाणक्य म्हणतात की, जंगलात सरळ झाडे आधी तोडली जातात आणि वाकडी झाडे नेहमी तसेच टिकून राहतात. त्याचप्रमाणे, आजच्या काळात भोळ्या लोकांचाच सर्वाधिक गैरफायदा घेतला जातो.
२. अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि च।
वञ्चनं चापमानं च मतिमान्न प्रकाशयेत्।।
चाणक्य नीतीनुसार, माणसाने आपलं गुपित किंवा योजना इतरांना सांगू नयेत. ही सवय माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, कौटुंबिक भांडणे आणि तुमचा केलेला अपमान या गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नयेत. आपली गुपिते, विशेषतः आपल्या योजना इतरांना सांगितल्यास ते आपला गैरफायदा घेऊ शकतात.
३. “न स्नेहात् कृत्वा विघ्नं न द्वेषात् न च लोभतः।
न मोहत् कार्यमत्यन्तं कार्यं कार्यवदाचरेत्॥”
या श्लोकात, आचार्य चाणक्य म्हणतात, “कोणतेही काम प्रेम, द्वेष, लोभ किंवा मोहापोटी करू नका. उलट, ते केवळ कर्तव्य म्हणून करा, जसे ते खरोखरच केले पाहिजे. त्यामुळे हा श्लोक जीवनातील निर्णय आणि कृतीमध्ये निष्पक्षतेचे महत्त्व दर्शवतो. जर तुम्ही तुमच्या कामात ही चूक केली, तर इतरांना तुमचा गैरफायदा घेण्याची संधी मिळू शकते.
४. यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव हि ।।
या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, जो मनुष्य स्थिर गोष्टी सोडून अस्थिर गोष्टींच्या मागे धावतो. तो जीवनात अनेक गोष्टी गमावतो आणि प्रयत्न करूनही त्याला मिळत सुद्धा नाही. अशा परिस्थितीत, तुमची ही सवय तुम्हालाही हानी पोहोचवू शकते.
