Rashi Bhavishya 4 July 2026 In Marathi : आज ४ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील पंचमी तिथी असणार आहे. दुपारी १ वाजून ४४ मिनिटांपर्यंत धनिष्ठा मग शतभिषा नक्षत्र जुळून येईल, त्याचबरोबर प्रीती योग एकाच दिवशी जुळून येत आहेत. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त १२ वाजून १५ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे आजचा शनिवारी तुमच्यासाठी कोणती बातमी घेऊन येणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ४ जुलै २०२६ ( Dainik Rashi Bhavishya 4 July 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

आपल्या मर्जी प्रमाणे दिवस घालवा. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी. जन संपर्कातून काम होईल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

मानसिक दोलायमानता जाणवेल. स्थिर विचार करावेत. कामात अति घाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

ऐषारामाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कामसौख्याचा आनंद घ्याल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर संभवते.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत. भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. हातातील कामात यश येईल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

अचानक धनलाभाची शक्यता. आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात वेळ जाईल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

केलेल्या कामातून समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. अगदीच गरज असेल तरच प्रवास करावा. चालू कामास गतीमानता येईल. घरातील कामात समाधानी असाल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

दिवस कटकटीचा जाऊ शकतो. गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये. करमणुकीचा आनंद घ्याल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर