Shukra Ketu Yuti: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती यांना विशेष महत्त्व असते. ४ जुलै २०२६ रोजी सुख, वैभव आणि ऐश्वर्याचे कारक शुक्रदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत मायावी ग्रह केतू आधीपासूनच विराजमान आहेत. सिंह राशीत शुक्र आणि केतू यांची ही युती काही राशींसाठी खूप भाग्यशाली आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

केतू हा अध्यात्म आणि अनपेक्षित लाभाचा कारक मानला जातो, तर शुक्र हा भौतिक सुखांचा स्वामी आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना अचानक धनलाभ होण्याची आणि करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया, या खास युतीमुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे:

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी ही युती पाचव्या भावात होणार आहे. हा काळ तुमच्यातील लपलेली कला आणि बुद्धिमत्ता समोर आणणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना यशस्वी होतील. जर तुम्ही कला, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित असाल, तर तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा विशेष ओळख मिळू शकते. लॉटरी, शेअर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे मजबूत योग आहेत. अध्यात्म किंवा गूढ विषयांबद्दल तुमची आवड वाढू शकते, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीसाठी शुक्र-केतूची युती तिसऱ्या भावात होणार आहे. हा भाव धाडस, भाऊ-बहिणी आणि संवादाशी संबंधित असतो. डिजिटल मीडिया, लेखन, कन्सल्टन्सी आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप लाभदायक ठरेल. तुमच्या बोलण्याचा लोकांवर चांगला प्रभाव पडेल. व्यवसायासाठी केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन ओळखीमुळे व्यवसाय वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. तुमचा आत्मविश्वास आणि धाडस वाढेल, त्यामुळे मोठे निर्णय घेणे सोपे जाईल.

तुळ रास (Libra)

तुळ राशीच्या लोकांसाठी ही युती अकराव्या भावात म्हणजेच उत्पन्नाच्या भावात होणार आहे, जो अतिशय शुभ मानला जातो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील, त्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप चांगला राहू शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील आणि एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न वाढेल. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. मोठे भाऊ-बहिणी आणि प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे तुमचा सामाजिक संपर्क वाढेल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि केतूची युती नवव्या म्हणजेच भाग्याच्या भावात होणार आहे. भाग्याच्या भावात केतू असल्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती होण्याची शक्यता असते. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेश प्रवासाचे योग बनू शकतात. व्यवसायात परदेश किंवा दूरच्या ठिकाणांमधून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळाल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा जुना वाद मिटल्यामुळे धनलाभ होऊ शकतो. या काळात धार्मिक कार्ये आणि तीर्थयात्रांबद्दलची आवड वाढेल, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)