Daily Horoscope 4 June 2026 In Marathi : उद्या ४ जून २०२६ रोजी अधिक मासातील जेष्ठ महिन्यातील चतुर्थी तिथी रात्री ११ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल आणि मग चतुर्थी तिथी सुरु होईल. आज सकाळी ९ वाजून ३ मिनिटांनी शुक्ल योग आणि त्यानंतर ब्रह्मयोग जुळून येईल आणि रात्री ३ वाजून ४२ मिनिटांनी उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ३ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ २ वाजून १६ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. स्वामीकृपेने तुमचा गुरुवार कसा जाईल चला जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ४ जून २०२६ ( Horoscope Today 4 June 2026 In Marathi)

आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. इतरांना उदारपणे मदत कराल. गोडीने सर्वांना आपले मत पट‍वून द्याल. आर्थिक चिंता दूर होईल.

आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम प्रकारे आनंद घ्याल. काही कामे क्षुल्लक कारणास्तव रखडली जातील.

आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

जलद गतीने कामे पूर्ण कराल. क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल. किरकोळ अडचणीमुळे खट्टू होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल. जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा. खोटे बोलण्याने नुकसान संभवते. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतील. कागदपत्रांची नीट तपासणी करून पुढे जावे.

आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खटपट कराल. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.

आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागेल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ठामपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. कामातील शिस्त मोडून चालणार नाही. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

व्यापारातून चांगला नफा संभवतो. पत्नीची व्यवहारकुशलता दिसून येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.

आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

तुमच्या विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका. सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. कफ विकाराचा त्रास संभवतो. अविचाराने निर्णय घेऊ नका.

आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

मुलांशी गप्पागोष्टी करण्यात रमून जाल. कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्‍या रागावर आवर घालावा. पुढील काळासाठी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवा. आवडते पदार्थ खायला मिळतील.

आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

मुलांवरील खर्च वाढू शकतो. जवळचे नातेवाईक गोळा होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर