Rashi Bhavishya 4 March 2026 In Marathi : आज ४ मार्च हा बुधवार आहे. तसेच आज चैत्र फाल्गुन पक्षाची प्रतिपदा तिथी आहे, जी आज दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राहील. आजपासून वसंत ऋतूचा प्रारंभ होतोय. धृती योग आज सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. तसेच पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज सकाळी ७ वाजून ३९ पर्यंत राहील. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल.तर राहुकाल दुपारी १२ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजून ३० पर्यंत राहील.आजच्या या पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात कोणत्या राशींवर धनलक्ष्मीची कृपा राहील जाणून घेऊ…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ४ मार्च २०२६ (Dainik Rashi Bhavishya 4 March 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

नटण्याची हौस पूर्ण कराल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. प्रेमाच्या दृष्टीने नवीन मैत्री लाभेल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

रेस मध्ये चांगला लाभ होईल. मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल. करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील ज्येष्ठांची मदत होईल. मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते. जवळचे मित्र भेटतील. भावंडांच्या समस्या समजून घ्याल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

जुन्या कामातून लाभ होईल. पैशाचा सदुपयोग कराल. खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल. मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल. व्यावसायिक लाभ उत्तम होईल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल. आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल. कामाचा उरक वाढेल. चिकाटीने कामे कराल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

आध्यात्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. ऐहिक गोष्टींची कामना करू नये. मनात नसतानाही प्रवास करावा लागेल. ढोंगी लोकांविषयी तिटकारा दाखवाल. ठाम निर्णयावर भर द्यावा.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

अचानक धनलाभ संभवतो. मित्रांशी मतभेद संभवतात. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. भडकपणे मत मांडू नका.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

जोडीदाराची कर्तबगारी दिसून येईल. शांत संयमी विचार कराल. कामात पत्नीचा हातभार लाभेल. जबाबदारीने कामे उरकाल. चार-चौघांत कौतुक केले जाईल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. कामातील दिरंगाई टाळावी. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी. वडीलांच्या मताचा आदर करावा. इतरांना आनंदाने मदत कराल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

मुलांचा उडणारा गोंधळ दूर करावा. सतत काळजी करत बसू नये. रेस जुगारातून लाभ संभवतो. भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

(या लेखातील माहिती पूर्णपणे खरी किंवा अचूक आहे असा आमचा दावा नाही. अधिक तपशीलवार माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)