4th February Marathi Horoscope: ४ फेब्रुवारी हा दिवस पंचांगानुसार अत्यंत शुभ ठरणार आहे. आजच्या दिवशी १२ पैकी प्रत्येक राशीला कोणत्या ना कोणत्या मार्गातून लाभाचे योग आहेत. मेष ते मीनपैकी तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार आहे हे पाहूया..

मेष:-मोठ्या लोकांत उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?
Holi 2024 Shani Maharaj Nakshatra Gochar Before Gudhi Padwa
होळीनंतर शनी महाराज नक्षत्र बदलणार, गुढीपाडव्याआधी मेष ते मीनपैकी कुणाला होईल धनलाभ? १२ राशींचे भविष्य पाहा
Holika Dahan Shubh Muhurta significance timing history
२४ की २५ मार्च होळी नक्की कधी? होलिका दहनासाठी ‘हा’ पावणे दोन तासांचा मुहूर्त सर्वात शुभ, पाहा नियम

वृषभ:-बोलण्यातून कामे मिळवाल. इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यापरिवर्गाला दिवस चांगला जाईल.

मिथुन:-कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनाची विशालता दाखवाल. धार्मिक भावना जोपासाल.

कर्क:-आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदारा बरोबर गप्पा-गोष्टी कराल. पैज जिंकता येईल. कलेला पोषक वातावरण मिळेल.

सिंह:-मानसिक व्यग्रता जाणवेल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात. वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.

कन्या:-फार काळजी करू नये. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. ऐशारामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपाल.

तूळ:-मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृश्चिक:-प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल. घरात टापटीप ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

धनु:-कौटुंबिक जबाबदारी वाढेल. गोड बोलून कामे मिळवाल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल.

मकर:-श्रम वाढतील. आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल. बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल.

कुंभ:-झोपेची तक्रार जाणवेल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. काही कामे अडकून पडतील.

हे ही वाचा<< लक्ष्मी नारायण योगाने फेब्रुवारीचे ‘हे’ ८ दिवस होतील सोन्याचे; ‘या’ राशी गडगंज श्रीमंतीसह अनुभवतील आयुष्य बदलणारी घटना

मीन:-लहानांशी मैत्री कराल. मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. योग्य कागदपत्रे सादर करावीत.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर